Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मेंदीचे औषधी गुणधर्म

मेंदीचे औषधी गुणधर्म
आता सणावाराच्या दिवसात नटण्या-सजण्याबरोबर मेंदीचा वापर आवर्जून करण्याकडे स्त्रियांचा कल असतो. सौंदर्यसाधनेमध्ये मेंदीचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. मेंदीच्या पानातील रंगद्रव्यामुळे तसेच फुलातून मिळणार्‍या सुगंधी द्रव्यांमुळे मेंदीला व्यापारी महत्त्वही आहे. 
 
मेंदीमध्ये अनेक औषधी गुणतत्त्व आहेत. मेंदीच्या खोडाच्या सालीच्या अर्कामुळे त्वचारोग, पांढरे कोड आदी विकार दूर होतात. 
 
मेंदीच्या सालीच्या काढय़ाने मुतखडा दूर करता येतो. मेंदीच्या पानांचा लेप गळवे, जखमा, खरचटणे, भाजणे किंवा त्वचेचा दाह इत्यादींवर बाह्य उपचार म्हणून उपयुक्त ठरतो. 
 
मेंदीच्या पानांमध्ये वांतिकारक आणि कफोत्सारक गुणधर्म आहे. घसादुखी असल्यास गुळण्या करताना पाण्यात मेंदीची पाने घातली जातात. 
 
पायांची आग शमवण्यासाठी, शरीरातली अतिरिक्त ऊर्जा उत्सर्जित करण्यासाठी, डोकेदुखी थांबवण्यासाठी मेंदी डोक्याला किंवा पायाला लावतात. 
 
मेंदीच्या पानांचा, सालींचा अर्क क्षयविकार दूर करण्यासाठी उपयोगात येतो. मेंदीच्या फुलातून टीरोझसारखे सुगंधी द्रव्य प्राप्त होते. यालाच हीना किंवा मेंदीतेल म्हणतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हाय 'बी पी'ला ला नियंत्रणात करते वेलची