दरवर्षी लाखो लोक डासांमुळे होणाऱ्या आजारामुळे मरण पावतात. डास चावल्यामुळे मलेरिया, डेंगू आणि चिकनगुनिया सारखे आजार उद्भवतात. म्हणून डास वाढू नये त्यासाठी आपल्या सभोवतालीचे वातावरण स्वच्छ करण्याचा सल्ला दिला जातो. डास चावल्यानंतर होणारी खाज देखील आपल्याला त्रास देते. झोपताना डास चावल्यानंतर झोपच उडून जाते. डासांना घालविण्यासाठी तसे तर बरेच प्रकारचे स्प्रे, उदबत्त्या, इलेक्ट्रिक बॅट बाजारपेठेत उपलब्ध आहेत. परंतु डासांना घालवण्यासाठी काही घरघुती उपाय देखील आहे जे हर्बल आणि नैसर्गिक असल्याने काहीही त्रास होत नाही.
1 कडुलिंबाचे तेल -
कडुलिंबाचे तेल डासांना घालवण्यासाठी प्रभावी आहे. एका अध्यनानुसार, नारळाच्या तेलात आणि कडुलिंबाच्या तेलाला समप्रमाणात मिसळून आपल्या शरीरास लावल्याने डास जवळ येणार नाही अँटीफंगल, अँटीवायरल आणि अँटी बॅक्टेरियलच्या गुणधर्माने समृद्ध असलेल्या या कडुलिंबाच्या वासाने डास दूर पळतात.
2 पुदिना -
डासांना घालविण्यासाठी पुदिन्याचे तेल खूप प्रभावी आहे. पुदिन्याच्या तेलाला आपण आपल्या शरीरावर लावावे किंवा आपल्या घरात असलेल्या झाडांवर देखील फवारणी करू शकता. या मुळे डास जवळ येत नाही. पुदिन्याची पाने पाण्यात उकळवून त्याची फवारणी घरात केल्यास तरी देखील डास येत नाही.
3 तुळस -
डासांच्या अळ्या काढण्यासाठी तुळस प्रभावी आहे. जर आपण खोलीच्या खिडकीत तुळशीचे रोपटे लावल्यास तर या मुळे डास घरात होत नाही. याचा उल्लेख आयुर्वेदात देखील केलेला आहे. तुळशीच्या वनस्पतीपासून डास लवकर पळतात.
4 कापूर -
डासांच्या प्रादुर्भावाला दूर करण्यासाठी कापराचा वापर खूप उपयुक्त ठरू शकतो. डासांना घालवण्यासाठी खोलीचे दार आणि खिडक्या बंद करून कापूर जाळून ठेवून द्या. या नंतर 15 ते 20 मिनिटे खोली बंद ठेवा. असे केल्याने सर्व डास पळून निघतील आणि बराच काळ डास खोलीत येणार नाही.