Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पपईच नाही तर पपईच्या बिया आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या सात फायदे

पपईच नाही तर पपईच्या बिया आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या सात फायदे
पपईच्या बिया फेकू नका तर जाणून घ्या याचे फायदे. 
पपईच्या बिया सूजने कमी करतात.
पपईच्या बिया पाचन तंत्र सुरळीत करतात.
लीवरच्या समस्येसाठी पपईच्या बिया गुणकारी आहेत.
Papaya Seeds - तुम्ही अनेकदा रिकाम्या पोटी पपई खाण्याचा सल्ला ऐकला असेल. किंवा तुमच्या डाइटमध्ये पपई सहभागी करण्याचा विचार केला असेल. पपई आरोग्यासाठी खूप गुणकारी असते. आजारी व्यक्ति देखील पपईचे सेवन करू शकतात. पपई तुमच्या हृदयासाठी फायदेशीर आहे. सोबतच यात अँटीइंफ्लेमेटरी गुण असतात जे शरीरातील सुजेला कमी करतात. 
 
पपईमध्ये विटामिन C, विटामिन E, विटामिन B9, फाइबर, प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि पोटॅशियम सारखे पोषकतत्व असतात. पण तुम्हाला ठाऊक आहे का पपईच्या बिया पण आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यांना जर तुम्ही फेकत असाल तर तत्पूर्वी जाणून घ्या फायदे. 

1. अँटी बेक्टेरिअल- पपईच्या बिया अँटी बेक्टेरिअल असतात. जे आजार पसरवणाऱ्या जीवणुपासून आपले रक्षण करतात. सोबतच वायरस आणि इन्फेक्शन सोबत लढायला मदत करतात. 
 
2. कैन्सर पासून रक्षण- पपईच्या बियामध्ये असणारे तत्व कॅन्सर सारख्या गंभीर आजारापासून रक्षण करतात. कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी पपईच्या बिया वाळवून, ते बारीक करून त्यांचा उपयोग केला जातो. कॅन्सरवर काही औषध नाही आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने याचा उपयोग करावा. 
 
3. इंफेक्शन- इंफेक्शन झाल्यावर किंवा शरीराच्या एखादया भागमध्ये जलन होणे, सुजले असेल, दुखत असेल तर पपईच्या बिया आराम दयायला मदत करतात. पपई मध्ये अँटीइंफ्लेमेटरी गुण असतात. जे सुजेला कमी करतात. 
 
4. लीव्हर- लीव्हरच्या समस्येला कमी करून पपईच्या बिया त्याला मजबूत बनवण्याचे काम करतात. पपईच्या बिया लीव्हरसाठी चांगले औषध सिद्ध होते. 
 
5. किडनी-  पपईच्या बिया किडनी करीता पण फायदेमंद असतात. किडनी स्टोन आणि किडनीला चांगल्या प्रकारे क्रियान्वय करण्यासाठी पपईच्या बिया मदत करतात. 
 
6. ताप- ताप आल्यावर पपईच्या बियांचे सेवन खुप फायदेशीर ठरते. यांत असलेले अँटी बेक्टेरिअल तत्व जीवाणु पसरण्यापासून थांबवते व आरोग्य चांगले ठेवायला मदत करते. 
 
7. पाचन तंत्र- पाचनतंत्र सुरळीत ठेवण्यासाठी पपईच्या बिया चांगल्या असतात. यांच्या सेवनाने पाचन व्यवस्थित होते. आणि पाचन संबंधित सर्व समस्या दूर होतात. यात फायबरची मात्रा अधिक असते. तसेच काही लोक यांना रिकाम्या पोटी सेवन करण्याचा सल्ला देतात. 

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दारू प्यायचं थांबवलं की तुमच्या लिव्हरचं काय होतं?