Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Boost immunity मुळा खाल्ल्यास प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते

Boost immunity मुळा खाल्ल्यास प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते
, शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020 (15:20 IST)
हिवाळ्याच्या हंगामात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली प्रतिकारक शक्ती मजबूत राखणे, जेणे करून हंगामी रोग टाळता येऊ शकेल. तसं तर या हंगामात खाण्या-पिण्यासाठी बऱ्याच गोष्टी उपलब्ध असतात, पण असं काय खावं जेणे करून शरीरास निरोगी ठेवता येईल, हा एक मोठा प्रश्न आहे. 
 
आरोग्य तज्ज्ञ सांगतात की हिवाळ्यात मुळाचे सेवन करणं फायदेशीर आहे. बऱ्याच लोकांना याची भाजी खाणं आवडत तर बऱ्याच लोकांना तर मुळाची कोशिंबीर आवडते तर बरेच लोक याला सॅलड रूपात खातात. चला जाणून घेऊ या की हिवाळ्यात मुळाच्या सेवनाचे कोणते फायदे आहेत आणि कोणत्या रोगांपासून आपले संरक्षण होऊ शकतं.
 
मुळा शरीराच्या रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याचे काम करतं. वास्तविक यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळंत, जे आपल्याला हिवाळ्यात होणाऱ्या सर्दी पडसं पासून वाचण्यात मदत करतं. आपण दररोज याचा सेवन केल्यानं आजारापासून वाचू शकाल.
 
मुळाच्या सेवनाने हृदय रोगाच्या धोका कमी होतो. वास्तविक हे अँथोसायनिनचा चांगला स्रोत आहे, ज्याचा अभ्यास बऱ्याच जणांनी केला आहे आणि तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की हा हृदयरोगाचा प्रादुर्भाव कमी करण्याशी संबंधित आहे. 
 
मुळ्याचं सेवन केल्यानं पचन तंत्र व्यवस्थित ठेवण्यास देखील मदत मिळते. हे ऍसिडिटी पासून गॅसचा त्रास आणि मळमळ होण्यासारख्या समस्यांना सुधारण्यास देखील उपयुक्त आहे. 
 
हे लठ्ठपणा कमी करण्यासाठी देखील प्रभावी मानले जाते. आपल्याला दररोज आपल्या आहारात मुळा समाविष्ट करणं आवश्यक आहे.
 
मुळा मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. याचा सेवनाने रक्तातील साखरेच्या पातळीवर काहीही परिणाम होत नाही. मुळा रक्तातील साखरेचे शोषण नियंत्रित करण्यास मदत करतं. म्हणूनच मधुमेहाचे रुग्ण हे सेवन करू शकतात. हे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'काहीच नाही' तेनालीरामांची युक्ती