बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यावर आपल्याला असे वाटते की आता औषधोपचार करण्याची गरज आहे .तर असे नाही आपण काही घरगुती उपाय करून देखील या त्रासाला पासून आराम मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या
* तिळाला आपल्या आहारात समाविष्ट करा -तीळ आतड्यातील तेल आणि मॉइश्चर ची कमतरता दूर करतो.
* पुदिना आणि आल्याचा चहा प्या-हा चहा प्यायल्याने पोटाच्या स्नायूंना आराम मिळेल.आल्याच्या उष्णते मुळे बद्धकोष्ठता दूर होते.
* एरंडेल तेल- एरंडेल तेल अनोश्यापोटी घेतल्यावर बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा होतो.पचनासाठी देखील हे चांगले आहे. हे जास्त प्रमाणात घेऊ नये. या मुळे त्रास होऊ शकतो.
* कोरफड- हे केसांसाठी त्वचेसाठी तर चांगले आहेच परंतु बद्धकोष्ठतेचा त्रास देखील दूर करतात.हे शरीरासाठी फायदेशीर आहे. आतड्यांमधील पाण्याचे प्रमाण वाढवून बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यात उपयोगी आहे.आपण कोरफड रसाचा वापर देखील करू शकता.