तुमचे दात फक्त हसायला आणि अन्न चर्वणाच्या कार्यांमध्ये मदत करतात याने तुमच्या लुकमध्ये देखील फरक पडू शकतो. दातांमध्ये पिवळेपणा तुमच्या चेहर्याची सुंदरता कमी करू शकतो. चांगले आणि पांढरे शुभ्र दात तुमचे व्यक्तिमत्त्व बदलू शकते.
खास करून जेव्हा एखादी मुलगी लिपस्टिक लावते आणि तिचे दात पिवळे असले तर तो चेहरा बघायला छान दिसत नाही. जर तुमच्या बरोबरदेखील ही समस्या असेल तर आता टेन्शन घेऊ नका. तुम्हाला तुमचे दात चमकदार आणि पांढरे हवे असेल तर लिंबाचा वापर करा. याचा वापर केल्याने पिवळे दात देखील पांढरे आणि चमकदार होऊ शकतात.
1. रोज दोनवेळा ब्रश करा. ब्रश केल्यानंतर लिंबाच्या रसात थोडे पाणी घालून दातांची मसाज करा.
2. वाळलेल्या लिंबाच्या सालांची पूड करून ठेवून घ्या. याला दिवसातून एकवेळा दातांवर चोळा. दात चमकायला लागतील.
3. लिंबा रस आणि बेकिंग सोडा एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा आणि त्याने दातांवर ब्रश करा. दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होईल.
4. एक चमचा लिंबाचा रस घेऊन त्यात अर्धा चमचा मीठ घालून त्याने दातांची मॉलिश करायला पाहिजे. दात एकदम स्वच्छ होतील.
5. ज्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए जास्त असतं, त्या भाज्या दातांसाठी फायदेशीर ठरतात. उदाहरणासाठी ब्रोकली, भोपळा आणि गजराचे सेवन जास्त केल्याने हिरड्यांची स्वच्छता व मसाज होते. या भाज्या दातांना पांढरे आणि चमकदार बनवतात.
6. चहा, कॉफी व माउथ वॉश, ह्या तिन्ही वस्तू बर्याचदा दातांमध्ये होणार्या पिवळेपणाला जबाबदार असतात. या पिवळेपणाला दूर करण्यासाठी माउथ वॉशचा जास्त वापर करणे टाळावे. चहा व कॉफीचे सेवन जास्त नाही केले पाहिजे.
7. बर्याच वेळापर्यंत एकच ब्रशाचा वापर केल्याने देखील दातांवर दुष्परिणाम होऊ शकतो. दातांच्या इनेमलला स्वस्थ ठेवण्यासाठी प्रत्येक दोन महिन्यांमध्ये आपला ब्रश जरूर बदलायला पाहिजे.
8. दातांना पांढरे करण्याचा उपचार तेव्हाच करायला पाहिजे जेव्हा घरगुती प्रयोग कामी पडत नाही, कारण दातांना पांढरे करणार्या उपचारांचे काही निगेटिव्ह परिणाम देखील बघायला मिळतात.