घरात अस्वच्छता आणि ओलसरपणा असल्यावर झुरळ येतात. झुरळ ज्यांना बघूनच किळस येतो. झुरळांचे ठिकाण म्हणजे स्वयंपाकघर आणि स्टोअर रूम.
बाजारात अशी अनेक उत्पादने आहेत की त्यांचा दावा आहे की त्यांचा वापर केल्याने झुरळ कायमचे नष्ट होतील, परंतु या मध्ये काही रसायन असे वापरतात ज्यांचा वापर करणे आरोग्यास धोकादायक होऊ शकतो. विशेषतः जेव्हा आपल्या घरात लहान मुलं असतील. अशा परिस्थितीत, हे काही घरगुती उपाय अवलंबवावे.
1 तमालपत्र -
तमालपत्राचा वापर केल्याने ह्याच्या वासामुळे झुरळे जातात.घराच्या ज्या भागात झुरळ आहे तिथे तमालपत्राची काही पाने हाताने मॅश करून टाकून द्या. तिथून झुरळे दूर जातील. तमालपत्र हातावर चोळल्याने तेल दिसेल. या तेलाच्या वासामुळे झुरळे निघून जातात.वेळोवेळी पाने बदलत राहा.
2 बॅकिंग पावडर आणि साखर -
एका भांड्यात सम प्रमाणात बेकिंग पावडर आणि साखर घ्या. हे मिश्रण बाधित भागावर शिंपडा. साखरेची गोडचव त्यांना आकर्षित करते. वेळच्यावेळी ते बदलत राहा.
3 लवंगाचा वास-
स्ट्रॉंग लवंगाचा वास देखील झुरळ काढून टाकण्यासाठी एक चांगला उपाय आहे.स्वयंपाकघराच्या कपाटात, ड्रॉवर आणि स्टोअर रूमच्या कपाटात लवंग ठेवा.या उपायामुळे झुरळ पळून जातील.
4 रॉकेल चा वास - रॉकेलचा वास देखील झुरळांना पळवून लावतो.
5 बोरॅक्स पावडर-
ज्या ठिकाणी झुरळ आहे त्या ठिकाणी बोरॅक्स पावडर घालून ठेवा. असं केल्यानं झुरळ पळून जातात. ह्याची फवारणी करताना मुलांची काळजी घ्यावी.