rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या ड्रिंकने सात दिवसात कमी करा फॅट्स

weight loss
साइड इफेक्टचा धोका टाळून आपण घरगुती औषधाने बॉडी फॅट्स दूर करू शकता. येथे आम्ही जी रेसिपी सांगत आहोत त्याने वजन लगेच कमी व्हायला सुरू होतं. जर आपण पोट, हाताचे दंड आणि मांड्याच्या फॅट्समुळे परेशान असाल तर ही रेसिपी आपल्यासाठीच आहे समजा.
 
सामुग्री: अर्धा ग्लास पाणी, 1 लिंबू, 1 काकडी, 1 चमचा कोरफडाचा रस, 1 चमचा किसलेलं आलं, एक मुठी हिरवी कोथिंबीर आणि ओवा.
 
कृती: ही सर्व सामुग्री मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
 
रोज सकाळी रिकाम्या पोटी या ज्यूसचे सेवन करावे.
 
यात सामील लिंबाचा रस अपशिष्ट पदार्थ बाहेर काढून शरीर स्वच्छ करण्यात मदत करतं. आलं पचनासाठी चांगले असून याने फॅट्स कमी होतात. काकडीत पाण्याची मात्रा अधिक असल्यामुळे वजन कमी करण्यात खूप मदत मिळते. कोथिंबीर आणि ओव्याने कॅलरी कमी होते कारण यात नैसर्गिक तत्त्व आणि अँटी ऑक्सीडेंट्स आढळतात. हे पदार्थ वाटर रिटेन्स दुरुस्त करून फुलण्याची प्रवृत्ती दूर करतं. कोरफडमध्ये फॅट्स गळवणारे तत्त्व आढळतात म्हणून याने पचन चांगलं होतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेंगा फ्राय - व्हेज मासे