चंदन फक्त थंडावाच देत नाही तर हे एक औषधही आहे. कोरड्या शुष्क त्वचेसाठी चंदन वरदान आहे. चंदनाचा वापर साबण, डिटर्जेंट, कॉस्मेटिक, परफ्यूम, आफ्टर शेव, उदबत्ती बनवण्यासाठी केला जातो. चंदनाचे तेल व पावडरही बाजारात मिळते.
* चंदन पावडर पाण्यात उकळून घ्यावी व अंघोळीच्या पाण्यात हे पाणी मिसळून अंघोळ केल्याने संपूर्ण दिवस शरीर ताजेतवानं राहते.
* उन्हाळ्यात चंदनाचा लेप त्वचेवर लावल्याने शरीराला थंडावा मिळतो, त्याचबरोबर शरीर दिवसभर सुगंधित राहते.
* गुलाब पाण्यात चंदन टाकून त्याचा लेप लावल्याने पिंपल्स येत नाहीत.
* कच्च्या दुधात चंदन पावडर मिसळून पेस्ट बनवावी व ही पेस्ट चेहर्यावर लावल्याने चेहरा चमकदार होतो.
* आगीमुळे शरीर भाजले असेल तर त्या ठिकाणी चंदनाला तुपात मिसळून लावल्याने शरीराची दाह कमी होण्यास मदत होते व जखम लवकर भरते.
* चंदन व मध मिसळून डोळ्यांच्या खाली लावल्यास काळे डाग दूर होतात.
* कोरड्या त्वचेला चंदनाच्या तेलाने मॉलिश केल्याने त्वचा नितळ बनते.
* उन्हाळ्यात होणार्या घामोळ्यांवर चंदनाचा लेप लावल्याने घामोळ्या लवकर बर्या होतात.