* आपले केस पांढरे व्हायला लागले असतील तर लिंबूच्या रसात आवळा पावडर मिसळून केसांना लावा. याने पांढरे केसदेखील काळे व्हायला लागतात. तिळाच्या तेलाचे सेवनही फायदेशीर राहील.
* नियमित अंघोळ केल्यावरही जर आपल्या शरीरातून दुर्गंधी येत असेल तर अंघोळीच्या आधी बेसन आणि दहीचे पेस्ट करून लावा. याने त्वचा स्वच्छ होऊन जाईल आणि बंद रोम छिद्र खुळून जातील. लवकरच दुर्गंधी येणे थांबेल.
* चेहर्यावरील पिंपल्समुळे त्रस्त असाल तर रोज लिंबाच्या पाण्याची वाफ घ्यावी. काही दिवस नियमितपणे हा उपाय केल्याने पिंपल्सची तक्रार दूर होईल. कच्ची पपई, लिंबू आणि टॉमेटो रस लावण्याने पिंपल्स बरे होतात.
* दालचिनी, लिंबू आणि मध मिसळून सेवन केल्याने सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. आधी मध थोडे गरम करून पातळ करून घ्यावे, नंतर त्यात लिंबू आणि दालचिनी मिसळून सेवन करावे.