Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारताच्या भात्यातील क्षेपणास्त्रे

भारताच्या भात्यातील क्षेपणास्त्रे

वेबदुनिया

भारतीय सैन्य जगातील सर्वांत शक्तीशाली सैन्यांपैकी एक मानले जाते. अनेक युद्धांत विजयश्री मिळवून भारतीय सैन्याने आपली मान अभिमानाने उंच ठेवली आहे. या सैन्याच्या भात्यात अनेक आधुनिक क्षेपणास्त्रे आज तैनात आहेत. कमी, मध्यम आणि लांब पल्ल्याची ही क्षेपणास्त्रे आहेत.

त्यांची निर्मिती १९७९ मध्ये सुरू झाली. त्यानुसार तिन्ही सैन्यदलांसाठी पाच प्रकारची क्षेपणास्त्रे बनविण्याचे काम सुरू झाले. त्यानुसार पृथ्वी, अग्नी, आकाश, त्रिशूल किंवा नाग आणि त्यानंतर रशियाच्या सहकार्याने ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले. अस्त्र या अन्य एका क्षेपणास्त्राचा विकास सुरू आहे. भारताचा क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम कोणत्याही देशाविरूद्ध नाही. केवळ आत्मसंरक्षणासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आता माहिती घेऊया भारताच्या ताफ्यात असलेल्या क्षेपणास्त्रांची.

अग्न
हे भारताच्या ताफ्यातील सर्वांत शक्तीशाली क्षेपणास्त्र मानले जाते. हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. भौगोलिक स्थितीनुसार याला तीन भागात विकसित करण्यात आले आहे. अग्नी १, अग्नी २ यांची मारक क्षमता सातशे ते दोन हजार किलोमीटर आहे. यशस्वी चाचणीनंतर त्यांना सैन्यात सामील करण्यात येत आहे. साडेतीन हजार किलोमीटरचा पल्ला असणार्‍या अग्नी तीनची चाचणी घेणे सुरू आहे.

पृथ्व
भारतीय सैन्यातील महत्त्वाचे क्षेपणास्त्र आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या या क्षेपणास्त्राचे नियमित उत्पादन सुरू झाले आहे. हे क्षेपणास्त्र सैन्यातही सामील करण्यात आले आहे. हवाई दलासाठीच्या या क्षेपणास्त्राचे कामही पूर्ण झाले आहे. पृथ्वीच्या दोन आवृत्त्या आहेत. पहिल्याची मारक क्षमता दीडशे किलोमीटर तर दुसर्‍याची अडीचशे किलोमीटर आहे. दोन्ही क्षेपणास्त्रात अनुक्रमे एक टन ते पाचशे किलोग्रॅम लोड घेऊन जाण्याची क्षमता आहे. हवाई दलात सामील करण्यात येणार्‍या क्षेपणास्त्राची मारक क्षमता अडीचशे किलोमीटर तर नौदलासाठीच्या क्षेपणास्त्राची मारक क्षमता साडेतीनशे किलोमीटर आहे. नौदलासाठीही स्वतंत्र क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात येत आहे. त्याचे नाव धनुष्य असे आहे. त्याची मारक क्षमता अडीचशे किलोमीटर आहे. हे पाचशे किलोग्रॅमचा लोड घेऊन जाऊ शकेल.

आका
NDND

हे क्षेपणास्त्र हवाई दलासाठी विकसित करण्यात येत आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे एकावेळी अनेक लक्ष्याचा वेध घेण्याची याची क्षमता आहे. युद्धात याची भूमिका महत्त्वाची आहे. जमिनीवरून आकाशात मारा करणारे हे क्षेपणास्त्र वाहून नेण्यासही सोपे आहे. याच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तीस किलोमीटरवरील लक्ष्य हे क्षेपणास्त्र पन्नास सेकंदात गाठू शकते. त्यामुळे शत्रूसाठी हे अत्यंत घातक क्षेपणास्त्र आहे.

त्रिशू
webdunia
NDND
सैन्याच्या तिन्ही विभागांसाठी उपयुक्त असे जमिनीवरून हवेत मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे. जमिनीजवळून उड्डाण करणार्‍या विमानांसाठी हे क्षेपणास्त्र घातक आहे. अमेरिकेच्या पॅट्रियट क्षेपणास्त्रासारखेच हे आहे. त्याच्या अनेक यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता पाचशे मीटर ते नऊ किलोमीटर आहे. त्याची रेंज ११.५ किलोमीटरपर्यंत वाढविण्यासाठी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. पंधऱा किलोग्रॅम वॉरहेड घेऊन जाण्याची याची क्षमता आहे.

ना
याचे कार्य नागाप्रमाणेच आहे. हे क्षेपणास्त्र आकाराने लहान असूनही घातक आहे. हे टॅंकवेधी क्षेपणास्त्र डागल्यानंतर फक्त विसरून जायचे. ते आपोआप लक्ष्याचा वेध घेऊन त्याला उध्वस्त करून टाकते. या क्षेपणास्त्राला बीएमपी २ एडव्हान्स लाईट हेलिकॉप्टरने सुद्धा सोडता येते. त्याची मारक क्षमता चार किलोमीटर आहे. कोणत्याही प्रकारच्या हवामानात ते आपले काम करू शकते. त्याची अनेकदा यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

ब्रम्हो
क्रूझ क्षेपणास्त्रांच्या श्रेणीतील हे सर्वांत चांगले क्षेपणास्त्र आहे. रशियाच्या सहकार्याने त्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्याची मारक क्षमता २९० किलोमीटर आहे. ध्वनीपेक्षा जास्त वेगाने उड्डाण करून ते लक्ष्याचा वेध घेते. आतापर्यंत सर्व चाचण्यात अपेक्षित लक्ष्य गाठण्यात यशस्वी ठरले आहे. तिन्ही सैन्यांना वापरता येईल अशा प्रकारे त्याला बनविण्यात आले आहे. लढाऊ विमानातूनही त्याला सोडता येते.

अस्त्
हवेतून हवेत मारा करणार्‍या या क्षेपणास्त्राला हलक्या विमानातून डागता येईल अशा पद्धतीने तयार करण्यात येत आहे.

इतर संरक्षणास्त्र
देशी बनावटीचे हलके लढाऊ विमान (एलसीए), तसेच अर्जुन रणगाडा (एमबीटी) आपल्या ताफ्यात आहे. जगातील अत्याधुनिक लष्कराशी तुलना करता येईल एवढे आपले लष्कर आधुनिक झाले आहे. हलक्या लढाऊ विमानातून अनेक माध्यमातून लक्ष्याचा वेध घेता येतो. तसेच एकच सीट असणारे एकच इंजिन असणारे हे विमान आहे. शिवाय हे जगातील सर्वांत हलके विमान आहे. त्याशिवाय रडार, सोनार आणि अत्याधुनिक पाणबुड्यांनीही आपला शस्त्रास्त्रसाठा मजबूत केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi