तुम्हाला तुमच्या घरांवर व दुकानांवर राष्ट्रध्वज वर्षभर फडकावावासा वाटतो. पण त्यासाठी त्याचा मानसन्मान पाळला गेला पाहिजे. त्याच्याविषयीच्या नितीनियमांची माहिती...
राष्ट्रध्वज उतरवणे
देशातील महान व्यक्ती, राष्ट्राध्यक्ष यांचे निधन झाल्यास त्यांचा सन्मान राखण्यासाठी शोक पाळण्यात येतो. त्यावेळी राष्ट्रध्वजाला झुकविण्यात येते. याचा अर्थ ध्वज दंडाच्या मध्यभागी आणून फडकावण्याच्या स्थिती ठेवण्यात येते. राष्ट्रध्वज घेऊन संचलन किंवा मिरवणूकीने शोक व्यक्त केला जात असेल तर भाल्याच्या अग्रभागी काळ्या रंगाच्या दोन पट्टाय लावल्या जातील. त्या पट्ट्या लटकलेल्या असतील. मात्र, असे प्रयोग केवळ शासनाच्या आदेशावरच होतील.
खालील व्यक्तींचे निधन झाल्यास ध्वज उतरविण्याचे प्रभाव क्षेत्र
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा पंतप्रधान- संपूर्ण भारतात
लोकसभा अध्यक्ष किंवा भारताचे सरन्यायाधीश- दिल्लीत
केंद्रिय मंत्रिमंडळ स्तरावरील मंत्री- केवळ दिल्ली व राज्यांच्या राजधानीत
केंद्र, राज्यमंत्री किंवा उपमंत्री - दिल्लीत
राज्यपाल, उपराज्यपाल, मुख्यमंत्री, संबधित किंवा संघशासित राज्याचा मुख्यमंत्री- संपूर्ण राज्य
कोणत्याही राज्याचा मंत्रिमंडळ स्तराचा मंत्री- संबंधित राज्याच्या राजधानीत
सूचना- दिल्ली म्हणजे दिल्ली महापालिका, नवी दिल्ली नगर पालिका व कॅन्टोन्मेंट बोर्ड या सर्व भाग.
विशेष स्थिती
राष्ट्रीय उत्सवावेळी अर्थात पंधरा ऑगस्ट, २६ जानेवारीला देशातील मोठ्या व्यक्तीचे निधन झाल्यास राष्ट्रीय शोक घोषित केला जातो. त्यावेळी ध्वज उतरविला पाहिजे.मात्र या दिवशी सर्वत्र ध्वजारोहण कार्यक्रम नेहमीप्रमाणे होतील. फक्त ज्या इमारतीत त्या व्यक्तीचे पार्थिव ठेवले आहे, तेथील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविलेला असेल. पार्थिव शरीर अंत्यसंस्कारासाठी बाहेर काढण्यात आल्यानंतर राष्ट्रध्वजाला पूर्ण उंच फडकावले पाहिजे.
शहिदांवर राष्ट्रध्वज
देशासाठी प्राणांचे बलिदान देणार्या जवानांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रध्वज त्यांच्यावर लपेटण्यात येतो. त्यावेळी केशरी पट्टी डोक्याच्या दिशेने आणि हिरवी पट्टी मांड्यांच्या दिशेने असली पाहिजे. पांढरी पट्टी डोक्यापासून पायापर्यंत आणि केशरी आणि हिरवी पट्टी डाव्या व उजव्या बाजूला अशी स्थिती अजिबात नको. आणखी एक महत्त्वाची बाब. शहीद वा मोठ्या व्यक्तिंच्या अंत्यसंस्कारावेळी राष्ट्रध्वज जाळायचा वा दफन करायचा नाही. मुखाग्नी देण्यापूर्वी किंवा दफन करण्यापूर्वी तो काढून घेतला पाहिजे.
नष्ट कसा करायचा
रंग उडालेला, फाटलेला राष्ट्रध्वज फडकावण्यास योग्य नसतो. असे करणे म्हणजे ध्वजाचा अपमान करणे आहे हे लक्षात ठेवा. राष्ट्रध्वजाची अशी स्थिती झाल्यास गुप्तपणे त्याला अग्नीच्या स्वाधीन केले पाहिजे. किंवा वजन किंवा रेतीत बांधून पवित्र नदी किंवा जलसमाधी दिली पाहिजे. पार्थिव शरीरावरून उतरवलेल्या ध्वजाच्या बाबतीतही असे केले पाहिजे.
राष्ट्रध्वजाचा अपमान
पाणी ओतणे, जमिनीवर पाडणे, फाडणे, जाळणे, त्यावर लिहिणे किंवा व्यावसायिक उद्देशाने वापर करणे हा राष्ट्रध्वजाचा अपमान समजला जातो. राष्ट्रध्वज झुकवणे हाही अपमान समजला जातो.