Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ग्रेग शेफर्ड: 'डेअर डेव्हिल्स' दिल्ली संघाचे प्रशिक्षक

ग्रेग शेफर्ड: 'डेअर डेव्हिल्स' दिल्ली संघाचे प्रशिक्षक
पूर्ण नाव: ग्रेग शेफर्ड
जन्म: 13 नोव्हेंबर, 1956, पर्थ (ऑस्ट्रेलिया)

ग्रेग शेफर्ड ऑस्ट्रेलियाचे प्रथम श्रेणीतील खेळाडू आणि प्रशिक्षक होते. 1977 ते 1985 पर्यंत त्यांनी पश्चिम ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले आणि 1991 मध्ये टास्मानियाकडून खेळताना त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर ते टास्मानियाचे प्रशिक्षक बनले आणि मागील वर्षी व्हिक्टोरीयन बुश रेंजर्सचे प्रशिक्षक बनले.

उजव्या हाताने फलंदाजी करणार्‍या सलामीवीर शेफर्ड यांनी ऑस्ट्रेलिया संघाकडून कोणताही सामना खेळला नाही. पण 1985-86 आणि 1986-87 मध्ये दक्षिण आफ्रीकेविरूद्ध खेळलेल्या बंडखोर संघाकडून ते खेळले होते. यादरम्यान त्यांनी 28.2 च्या सरासरीने 397 धावा बनविल्या होत्या. त्यांचा सर्वोत्कृष्ठ स्कोर 79 धावांचा आहे.

शेफर्ड यांनी एकूण 112 प्रथम श्रेणीचे क्रिकेट सामने खेळले असून 42.27 च्या सरासरीने 6806 धावा बनविल्या आहेत. पश्चिम ऑस्ट्रेलिया संघाचे ते खेळाडू होते. त्यांनी सलग तीन वेळा म्हणजे 1980 ते 83 मध्ये शेफिल्ड ढाल मिळवली होती.

1983 मध्ये टास्मानियाकडून खेळताना त्यांनी एका डावात 571 चेंडूत 200 धावांची खेळी केली होती. याचबरोबर 481 व्या मिनिटाला मंद गतीने आपले शतक पूर्ण करण्याचा विक्रमही शेफर्ड यांच्या नावावर आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi