Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लालचंद सीताराम राजपूत

लालचंद सीताराम राजपूत
लालचंद राजपूत- मुंबई इंडियन्स संघाचे प्रशिक्षक
पूर्ण नाव- लालचंद सीताराम राजपूत
जन्म- 18 डिसेंबर 1961 (महाराष्ट्र)

लालचंद राजपूत यांना सचिन तेंडूलकरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू असलेले लालचंद सीताराम राजपूत भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक आहेत. त्यांनी १९८५ ते १९८७ च्या दरम्यान दोन कसोटी आणि चार आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यांचा जन्म १८ डिसेंबर १९६१ रोजी महाराष्ट्रात झाला होता.

लालचंद राजपूत यांच्या गुणांची ओळख पटली ती सुनील गावस्कर यांच्या मधल्या फळीत खेळण्याच्या निर्णयामुळे. त्यामुळे सलामी फलंदाज म्हणून राजपूत यांना संधी मिळाली.

सन १९८५ मध्ये ते श्रीलंका दौर्‍यावर गेले. तेथे पहिल्याच कसोटीत त्यांनी ३२ व ६१ धावा त्यांनी केल्या. दुसर्‍या डावात त्यांनी तिसर्‍या गड्यासाठी दिलीप वेंगसरकरबरोबर ७६ धावांची भागिदारीही केली. पण पुढच्या कसोटीत ते शून्य व १२ धावाच बनवू शकले. त्यामुळे त्यानंतरच्या कसोटीसाठी अष्टपैलू रवी शास्त्रीला संधी देण्यात आली.

राजपूत खेळाबरोबरच अभ्यासातही पुढे आहेत. त्यांनी एमबीए केले आहे. अंडर-१९ संघाच्या इंग्लंड दौर्‍यातही ते प्रशिक्षक म्हणून होते. ट्वेंटी-२० विश्वकरंडकादरम्यान ते संघाचे व्यवस्थापक होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi