Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्यंकटेश प्रसाद: 'रॉंयल किंग' बंगळूर संघाचा प्रशिक्षक

व्यंकटेश प्रसाद: 'रॉंयल किंग' बंगळूर संघाचा प्रशिक्षक
पूर्ण नाव: बापू कृष्‍णराव व्यंकटेश प्रसाद
जन्म: 5 ऑगस्‍ट, 1969, बंगळूर (कनार्टक)

भारतीय क्रिकेट संघात खेळाडू म्हणून राहिलेल्या व्यंकटेश प्रसादने 1996 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. कर्नाटकचा गोलंदाज जवागल श्रीनाथचा सहकारी म्हणूनही त्याला ओळखले जाते.

उंचापुरा सडपातळ बांधा असलेला प्रसाद जलदगती गोलंदाज म्हणून ओळखला जातो. जलदगतीने गोलंदाजी करण्याची त्याची शैली अत्यंत प्रभावशाली होती. याशिवाय 'सीम चेंडू' टाकण्‍यामुळे त्याने अनेक वर्षे भारतीय संघात आपले स्थान टिकविले होते. एकदिवसीय व कसोटी सामन्यासाठी भारताच्या प्रमुख खेळाडूंपैकी तो एक होता.

मैदानावर तो नेहमी आपल्या टी-शर्टचे वरचे बटन उघडे ठेवून गोलंदाजी करत‍ असे आणि विकेट मिळल्यानंतर पंचासारखे वर बोट करून नाचत असे हे त्याचे एक खास वैशिष्ट्य होते.

आपल्या कसोटी करीअरमध्ये प्रसादने 35 च्या सरासरीने एकूण 33 सामन्यात 95 बळी घेतले आहेत. एकदिवसीय सामन्यातही त्याने चांगली कामगिरी केली आहे. 161 एकदिवसीय सामन्यात 32.2 च्या सरासरीने 196 बळी मिळविले आहेत. 1999 मध्ये चेन्नईत झालेल्या पाकिस्तानविरूद्धच्या कसोटी सामन्यात 33 धावांच्या बदल्यात सहा बळी घेतले होते. याच सामन्यात एकही धाव न देता पाच बळी त्याने मिळविले होते.

यापूर्वी डिसेंबर 1996 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध डरबन येथे झालेल्या कसोटी सामन्यातही प्रसादने दहा बळी मिळविले होते. तसेच, 1996 मध्ये इंग्लंड, 2001 मध्ये श्रीलंका आणि 1997 मध्ये वेस्ट इंडीजच्या एका कसोटी सामन्यात पाच बळींचा आकडा पार केला होता. 2001 मध्ये श्रीलंकेविरूद्ध व्यंकटेश प्रसादने आपल्या करीयरमधील शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi