दिवसभर काय काय केलं ?
कुणाकुणाला किती वेळा रागवलो ?
कुणाचे मन दुखावले ?
कुणावर ओरडलो ?
कुणाकुणाला आनंद दिला ?
कुणाच्या चेह-यावर हसू आणले ?
काय नको तसे वागलो,
काय हवे तसे वागलो,
. . . वगैरे गोष्टींचा विचार करणे, त्या टिपणे म्हणजे अंतरंगाचा सेल्फी. . . !!
रात्री या सर्वांचा विचार करायचा,
जे जे आज चुकले ते ऊद्या सुधारण्याचा प्रयत्न करायचा आणि आधीच्या दिवसापेक्षा दुस-या दिवसाची सेल्फी अधिक चांगली येईल यासाठी प्रयत्न करायचा. . .
....चेहऱ्याच्या सेल्फीपेक्षा अंतरंगाचा सेल्फी महत्वाचा असतो.