Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिल गेट्स यांचे 11 नियम

बिल गेट्स यांचे 11 नियम
, मंगळवार, 17 फेब्रुवारी 2015 (00:06 IST)
नियम1. जीवन चांगले असेलच असे नाही.त्याचा चांगला वापर करायला शिका. 
 
नियम2. जग हे तुमच्या सन्मानाची कधीच पर्वा करणार नाही.त्यासाठी आधी तुम्हाला काही तरी करून दाखवावे लागेल. 
 
नियम 3. शाळेतून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडल्या पडल्या तुम्हाला कोणीच जास्त पगार देणार नाही किंवा तु्म्हाला कार व मोबाईल अशा सेवाही देणार नाही. यासाठी तुम्हाला आधी खूप मेहनत करावी लागेल व उच्च पदापर्यंत स्वत: उडी घ्यावी लागेल.
 
नियम 4. तुमचे शिक्षक कडक आहेत, असा तुम्ही जर विचार करत असाल तर थोडे थांबा. तुम्हाला वरिष्ठ अधिकारी होण्यासाठी प्रतिक्षा करावी लागेल.
 
नियम 5. मोठा बर्गर तुमच्या पुढे काहीच नाही. परंतु त्यासाठी तुमचे वडिल बर्गर लिपिंगसाठी दुसर्या अर्थाचा शब्द वापरतात तर त्याला चांगली संधी म्हणावी लागेल.
 
नियम 6 तुम्ही मनमिळाऊ स्वभावाचे नसाल यात तुमच्या पालकांचा काही दोष नाही. तुम्ही स्वतःत बदल घडवून आणले पाहिजेत.त्यातूनदेखील नवीनच काही तरी शिकायला मिळेल.
 
नियम 7 तुमच्या जन्मानंतर तुमचे आई-वडिल तुमच्याकडे जास्त लक्ष देत नसतील. पण आता ते तुमच्याविषयी अधिक जागरूकता दाखवित असतील. तुम्हाला त्यांची परिक्षा घ्यावीशी वाटत असेल तर रात्रीच्या वेळी तुमच्या खोलीचा दरवाजा थोडा उघडा ठेवा. 
 
नियम 8 तुम्ही तुमच्या जीवनात यश- अपयश पाहिले असेलच. पण झालेली चूक कोणीच मान्य करत नाही. काही शाळांमध्ये असे दिसून आले आहे की, 'नापास' हा शब्दच त्याच्या शब्दकोशातून पुसुन टाकला आहे.त्यामुळे जीवनात कधीही अपयशाचा जास्त विचार न करता यशाचीच कास धरली पाहिजे. 
 
नियम 9 जीवनाला सेमिस्टरमध्ये वाटू नका. तसेच त्याला उन्हाळ्याची सुटी देखील मिळत नाही. त्यामुळे स्वत:ला शोधायचे असेल तर आधी आत्मविश्वास वाढविला पाहिजे.
 
नियम 10 टिव्हीवर जीवनाचे खरे दर्शन घडविले जात नाही. व्यक्तिला विविध टप्प्यातून काम करायला जावे लागते. त्याचवेळी जीवन काय आहे ते कळते. 
 
नियम 11 आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत. एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते.

Share this Story:

Follow Webdunia marathi