Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भुईमुगाच्या शेंगा

भुईमुगाच्या शेंगा
गरम गरम भुईमुगाच्या शेंगाची कढई समोर आणुन ठेवली, कढईभोवती बसुन शेंगा फोडुन खायला सुरवात केली. अशातच शेंगा फोडत असताना एखाद्या शेंगेतील शेंगदाना हातातुन खाली पडतो. आणी खालच्या टरफलांमध्ये गायब होतो. आपण मग तो बोटाने शोधायला सुरवात करतो. अगदीच अर्धा ते ऐक मिनीटाची ही क्रिया पण शेजारी कढईभर शेंगा असुनही त्या एका शेंगदाण्याला आपण शोधतो. थोडेसे तरी वैतागतो.
 
या नादात जवळ बसलेली व्यक्ती शेंगा जास्त संपवते.
 
आयुष्याचेदेखील असेच आहे का? पाटीभर आनंद शेजारी असुनही, आपण वाटीभर आनंदासाठी झुरतो. पाटीकडे लवकरकधी लक्ष्य जातच नाही. आणि जेव्हा पाटीकडे वळतो तेव्हा ती रिकामी झाल्याचे निदर्शनास येते.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi