Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी विनोद : जावयांची परीक्षा

मराठी विनोद : जावयांची परीक्षा
, गुरूवार, 16 ऑक्टोबर 2014 (16:52 IST)
सासूनं एकदा आपल्या तीन जावयांची परीक्षा घेण्याचे ठरवले. तिला बघायचे होते, कुणाचे तिच्यावर जास्त प्रेम आहे. मोठय़ा जावयाला ती नदीकाठी फिरायला घेऊन गेली. तिथे पाय घसरल्याचे नाटक केले. जावयाने पटकन तिला बाहेर काढले व तिचा जीव वाचवला. दुसर्‍या दिवशी त्याच्या दारात नवीन मोटारसायकल उभी होती. गाडीवर चिठ्ठी लिहिली होती - प्रेमळ सासूकडून भेट.
 
मधल्या जावयाबरोबर पण तेच नाटक केले. त्याने पण तिला तत्परतेने वाचवले. दुसर्‍या दिवशी त्याच्या दारात नवीन मोटारसायकल उभी होती. गाडीवर चिठ्ठी लिहिली होती, प्रेमळ सासूकडून भेट.
 
धाकट्या जावयाबरोबर त्याची परीक्षा घ्यायला नदीकाठी गेली व पुन्हा तेच नाटक केले. जावयाने मनात म्हटले, आयतीच बुडून मरते तर मरू दे, व त्याने दुर्लक्ष केले आणि ती मेली. परंतु दुसर्‍या दिवशी त्याच्या दारात आठ लाखांची नवी कोरी गाडी उभी होती. गाडीवर चिठ्ठी लिहिली होती, 'धन्यवाद, प्रेमळ सासर्‍याकडून भेट .

Share this Story:

Follow Webdunia marathi