Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वाघ सिंह बी. एड्‍ वाला

- श्री. दादासाहेब तांदळे

वाघ सिंह बी. एड्‍ वाला
NDND
मित्रानं माझ्या एक जोक सांगीतला,
कोणी एक होता, बी.ए.बी.एड्‍ झालेला.
नोकरीसाठी तो वनवन भटकला,
पण नोकरीचा ठिकाणा नाही लागला.
जाहिरातीतील मजकूर एकदा त्याने पाहिला,
नोकर पाहिजे होता झू पार्कला,
बी.ए.बी.एड्‍. वाला मुलाखतीस गेला.
'झू' पार्कचा होता वाघ मेलेला,
म्हणून शो साठक्ष वाघाचे कातडे पांघरुन,
बसावे लागणार होते त्याला.
चारशे रुपये पगार होता दर महिन्याला.
बी.ए.बी.एड्‍. वाल्याने विचार मनी केला,
हरकत नाही म्हणून नोकरीवर रुजू झाला.
आठवडा गेला, महिना गेला.
मुलं टाळ्या होती पिटत पाहून वाघोबाला!
पर एकदा मात्र घोटाळा झाला,
शेचारच्या सिंहाचा पिंजरा उघडा राहिला,
हळू हळू सिंह वाघाकडे चालला,
वाघ थरथरा कापायला लागला,
सिंह जवळ, आणखी जवळ आला.
वाघ आता भितीनं अर्धमेला झाला.
वाघाच्या कानाजवळ सिंह हळूच बोलला,
जरी तू बी.ए.बी.एड्‍. वाला,
आणि सभोवतालच्या झाडावरचा
प्रत्येक माकड आहे, एच्.एस्.सी.डी.एड्‍. वाला!
हसता हसता माझा चेहरा गोरा मोरा झाला,
कसं द्यायचं तोंड या जिवघेण्या स्पर्धेला?
रयतेनं नोकरी दिली आम्हाला,
एक पैसाही न मागता कोणाला!
रडत कडत जर टाकत पाटी,
नाही घडवले मातीच्या गोळ्याला,
पगार हा जनतेचाच पैसा,
उतून येईल आमच्या अंगला!

Share this Story:

Follow Webdunia marathi