Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘बाबा, लव्ह यू’

‘बाबा, लव्ह यू’
एकदा एक माणूस
नवी कोरी कार धूत होता.
अगदी मन लावून त्याचे काम
चालले होते.
तिथेच ...असलेली त्याची चार
... वर्षाची मुलगी दगड घेऊन
काही तरी करत होती.
थोड्यावेळाने त्याने पाहिले
तर ती टोकदार दगड घेऊन
त्या गाडीवर
काही तरी लिहीत होती.
त्याचा संताप अनावर झाला. ‘केलास
सत्यानाश?’ असं म्हणत
संतापाच्या भरात त्याने
जवळची एक
काठी घेतली आणि मुलीच्या बोटांवर
मारली. चार
वर्षाची चिमुरडी बिचारी कळवळून
रडायला लागली.
काठीच्या मार एवढा जोरात
होता की तिच्या नाजूक
हाताची बोटे फ्रॅक्चर झाली.
तातडीने तिला हॉस्पिटलमधये एडमिट
करावं लागलं.
वडिलांनी मारलं
तरी मुलगी मात्र त्यांच्यावर
रागावली नव्हती. ‘बाबा,
माझी बोटं
पुन्हा चांगली कधी होणार’
असं ती त्यांना विचारत राहिली.
तिचे वडिल काहीच
बोलू शकले नाहीत.
त्यांच्या डोळ्यातून फक्त
आपल्या कृत्याचा पश्चात्ताप
तेवढा वहात होता.
त्यांना स्वतःच्या कृतीवर संताप
आला.आपण
गाडीच्या प्रेमापोटी
आपल्या मुलीला मारले हे
त्यांना सहनच झाले नाही.
त्याच भरात ते गाडीजवळ गेले
आणि तिच्यामुळे हे घडले म्हणून
त्या नव्या कोर्‍या गाडीवर
लाथा झाडायला लागले.
थोड्यावेळाने त्यांचे लक्ष
गाडीवर लिहिलेल्या
अक्षरांवर गेले. त्यांच्या मुलीने
तिथेच काही तरी खरडलं होतं.
त्यांनी जवळ जाऊन नीट
पाहिलं. त्यावर त्या मुलीनं
लिहिलं होतं, ‘बाबा, लव्ह यू’.

Share this Story:

Follow Webdunia marathi