तिचं आणि माझं नातं काही वेगळंच आहे.एकमकींचे लाड करतो.उपदेश करतो.आमचे जितके मत भेद असतात तितकाच जिव्हाळा ही असतो. आमचे संवाद कधी हळवे, कधी हसून हसून डोळ्यात पाणी आणणारे.कधी बौद्धिक पातळी वरचे तर कधी स्वैपाकातील धाडसी प्रयोग यांची प्रेरणा असते. कधी उद्बोधक तर कधी आयुष्याला वेगळे वळण देणारे असतात.
माझा तिला आणि तिचा शारीरिक ,बौद्धिक ,मानसिक बदल लगेच जाणवतो त्या मागे कोणती अंत :प्रेरणा असते ?
जन्मजन्मांतरीचा एक स्त्री असल्याचा समान धागा तुझ्यातल्या मला माझे दर्शन घडवून देत असते.
कशाला बघू मी उगा दर्पणात, माझीच छबी दिसे मला तुझ्याच रूपात !
A mother's treasure is her daughter !
My beautiful girl, you have grown up so fast, you make me so proud to know that you are mine !!
- स्नेहल खंडागळे