आनंदाची दिवाळी आली
मन ही स्वच्छ करायला घ्या
जुन्या दुःखद आठवणींची जळमटे काढून फेका
अपमानाचे डाग धुवून टाका
अपयशाची खंत इथे तिथे रेंगाळत असेल तर तिला टोपलीत भरुन बाहेर नेऊन टाका
आशेचे नव्हे, विश्वासाचे नवीन दिवे लावा
प्रसन्नतेची तोरणे दाराखिडक्यांना लावा
उत्साहाच्या सुंदर रांगोळ्या अंगणभर घाला
प्रेमाची पक्वान्ने बनवून सगळ्यांनी मिळून पोऽऽऽऽटभर खाण्याचे ठरवून टाका, भिऊ नका! शुगर वजन बीपी वगैरै काही वाढणार नाही.
वाढलाच तर आनंद वाढेल आयुष्यातला! आणि हो, आयुष्यही वाढेल उदंड
दिपावलीच्या आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा