गप्पा मारणे हे एक प्रकारचे काऊन्सिलिंग आहे...
सहली, उत्सव, गाण्यांच्या भेंडया, घरातली मनसोक्त भांडणं,
क्षमा मागून पुन्हा एकमेकांना जवळ घेणे…..
हे सर्व काऊन्सिलिंगच आहे.
वेळ फुकट जातो,
वेळ फुकट जातो म्हणून दरवेळा एकमेकांना टाळण्याची गरज नाही.
जाऊ द्या वेळ फुकट गेला तर जाऊ द्या.
निरर्थक वाटणाऱ्या हशा-टाळ्यांमधून फुकट गेले असे जे वाटतय,
त्यातून कुणीतरी आपल्या सोबतीला आहे,
हा विश्वासाचा ओलावा आपल्याला मेडिकलमध्ये न सापडणारे जीवनसत्त्व देईल...!
खूप सुंदर आहे हा विचार...
त्यामुळे मनसोक्त गप्पा मारा,
अजिबात गप्प राहू नका...!!