Publish Date: Tue, 07 May 2019 (11:32 IST)
Updated Date: Tue, 07 May 2019 (11:37 IST)
कंठातून गाण्यात आणि
गाण्यातून अंतरंगात जे नेतात
ते सूर..... अक्षय
अनुभवातून वाक्यात आणि
वाक्यातून डोळ्यात जी चमकते
ती बुद्धी... अक्षय
वर्दीतून निश्चयात आणि
निश्चयातून सीमेवर उभे असते
ते धैर्य.... अक्षय
एकांतातून शांततेत आणि
शांततेतून आनंदात जो लाभतो
तो आत्मविश्वास... अक्षय
सुयशातून सातत्यात आणि
सातत्यातून ऐश्वर्यात जी बहरते
ती नम्रता... अक्षय
स्पर्शातून आधारात आणि
आधारातून अश्रुत जी ओघळते
ती माया.... अक्षय
हृदयातून गालावर आणि
गालावरून स्मितेत जे तरंगते
ते प्रेम... अक्षय
इच्छेतून हक्कात आणि
हक्कातून शब्दात जी उमटते
ती खात्री... अक्षय
स्मृतितून कृतित आणि
कृतितून समाधानात जी दिसते
ती जाणीव.... अक्षय
मनातून ओठावर आणि
ओठावरून पुन्हा मनात जाते
ती आठवण..... अक्षय
अक्षय तृतीयेच्या खुप खुप शुभेच्छा
webdunia
Publish Date: Tue, 07 May 2019 (11:32 IST)
Updated Date: Tue, 07 May 2019 (11:37 IST)