Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिच्चारा हिंगाळलेला नवरा

webdunia
एका दिवाळीच्या सकाळी अंघोळीला बसल्यावर पतिराज बाथरूमचा दरवाजा अर्धवट उघडून, ओरडून म्हणाले,
"अगं या उटण्याचा उग्र वास कसला येतोय...??"
थोडावेळ घरात एकदम शांतता पसरली..!!
 
पत्नी :- "अरे देवा..देवा...देवा... काय बाई तुमचा हा वेंधळेपणा...!! 
मी काल दोन पुड्या आणल्या होत्या, एक उटण्याची व दुसरी हिंगाची...!!
तुम्हाला अंघोळीसाठी उटण्याची पुडी घ्या म्हटले अन तुम्ही हिंगाची पुडी उचलली, अन फासली सगळ्या अंगाला.....!!! 
एव्हढेही कळू नये का एका ऑफिसात जाणाऱ्या सुपेरिन्टेंडेंटला ....????"
"काय म्हणावं बाई तुमच्या  वेंधळेपणाला..???
अरे देवा...!!
कसं होईल या संसाराचं...???
काय म्हणावं या माणसाला....??
बाई बाई बाई ...!!!!
मी म्हणून संसार करत राहिले...!!
मुस्कटदाबी सहन करून..!!! 
जळला मेला बायकांचा जन्म...!! 
देवाला रोज सांगते - देवा पुढल्या जन्मी मनुष्य जन्मात ठेवलेसच तर स्त्री नको, पुरुष बनव रे बाबा...!! 
देवा पांडुरंगा...!!"
 
पती - "अग अग किती किंचाळतेस...??
तो  हिंगाचा उग्र वास मी सोसतोय...!!
तू कशाला एवढं टेन्शन घेतेस..???"
 
पत्नी- "अहो, तुमच्या त्या उग्र वासाचं जाऊ द्या, मला काही पडले नाही त्याचे पण..!!
तुमच्या वेंधळेपणामुळे मी भाजीत उटणे टाकले त्याचं काय...???"

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

'प्यार दो प्यार लो' या गाण्याचा टीझर सोशल मिडीयावर चर्चेत