Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कामवाली बाई पंधरा दिवस झाले येत नव्हती

joke
हिम्मतराव यांच्या घरची कामवाली बाई पंधरा दिवस झाले येत नव्हती. दररोज भांडी घासून हिम्मतरावांची हालत बेकार झाली होती. शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगून ठेवलं होतं कोणी कामवाली असली तर पाठवून द्या म्हणुन... हालत बेकार आहे.
 
मग एक दिवस दुपारची भांडी घासून हिम्मतराव सुस्त झाले होते की तेवढ्यत दरवाजावरची बेल वाजली.....  बघतात तर शेजारीण एका बाईला बरोबर उभी होती. एकदम खूष होऊन आत बोलवतात. 
 
हिम्मतराव ड्रॉईंग रूम मध्ये बसले. शेजारीण त्या बाईला  घेऊन वहिनींबरोबर किचन रूम मधे गेल्या. शेजारीणला आपली किती काळजी आहे हा विचार करुन हिम्मतरावांच्या डोळ्यातून पाणी आलं. त्यांना विश्वासच वाटत नव्हता की आजच्या काळात पण काही लोक  दुसऱ्याचं दुःख समजतात आणि मदतीला येतात. 
 
असो, तर थोड्यावेळाने तिघी बाहेर आल्या  आणि शेजारीण त्या बाईला घेऊन आपल्या घरी गेली. 
 
काम दाखवायला आली वाटतं, भेटवायला आली असणार, पैसे बियसे फायनल करायला आली असणार. असले असंख्य विचार हिम्मतरावांच्या डोक्यात आले. गडबडीत हिम्मतरावांनी बायकोला विचारलं.. कधी  पासून येणार?? 
किती पैसे मागतेय? 
बायको: कोण कधीपासून येणार?  
हिम्मतराव : अगं, कामवाली बाई कधी पासून येणार आणी फायनल किती पैसे मागतेय 
हिम्मतरावांची बायको :- ओ हॅलो !!! कोणी बाई ?  बाई-वाई येणार नाही. ती शेजारीण, त्यांच्या कामवालीला, तुम्ही घासलेली भांडी दाखवायला घेऊन आली होती. अशी चकचकीत स्वच्छ भांडी घासायची म्हणुन 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्राण प्रतिष्ठापूर्वी अयोध्येमध्ये पोहचले राम-लक्ष्मण आणि सीता