लॉकडाऊन काळात कपाटातले कपडे बोलतात म्हणे.. त्यावरून, घरातली भांडी काय बोलत असतील असा मजेदार विचार आला मनात. ( अर्थातच भांडी घासताना ) ते लिहायचा प्रयत्न करते.
ताटं - एरवी नुसती कावळ्याची अंघोळ होते. आता आई कशी छान पाठ रगडून देते.
तवा - काल तर मला टॅमरंड पॅक लावून दिला आईनी. बघा, मी आज कसा गोरा गोरा झालोय.
कढई - मलापण काल विनेगर+सोडा असा टबबाथ मिळाला. सगळी डेडस्किन खरवडून काढली बाबांनी. मस्त हलकं हलकं वाटतंय.
चमचा - एरवी नुसती पाण्यात डुबकी मारतो मी, आज आईनी छान मान घासून दिली.
चहाचे भांडे - आज ताईने अंघोळ घातली इअरफोनवर केपॉप ऐकत ऐकत. त्या गाण्याच्या नादात मला तीन वेळा अंघोळ घातली. :( सर्दी झाली मला... आssssछ्छी...
कप - ताईने कान छान साफ केले मात्र माझे. आता छान ऐकायला येतेय.
कुकर - माझ्या घसा छान स्वच्छ केला आईनी काल. आता काय मस्त शिट्टी मारता येतेय.
गाळणी - खूप दिवसांनी माझे सगळे डोळे लख्ख उघडले. पूर्वी अंधुक अंधुक दिसत होतं, आता सगळं साफ साफ दिसतंय.
डब्बे...एरवी कवचितच मालकीनीचा हात फिरतो पाठीवरून . .अशात आमचं मस्त चाललंय .. ब्युटी सलून मध्ये जाऊन आल्यासारखे....गॅस ओटा:आम्ही तर नेहमीच बाई साहेबांच्या हाता खाली असतो.. घासून रगडून कधी कधी तर रागात .. झटापटी ...जाऊ द्या पण आताशा घरातल्या सगळ्यांच मायेचे हात फिरताना बरं वाटलं ...चेंज प्रत्येकाला च हवा न ...?
आता मुख्य...घासनी....तुमचं सगळ्यांचं बर चालय... माझी वाट लागली...मला तर शंका आहे माझी पाठवणी करून माझ्या जागी सवत आणायचा विचार आहे बाई सहेबांचा... आता बघा तुम्हाला काही सुचतय का ...? मी चालले भांडी घसायला.....