त्या नभशामल मिठीत नकळत.......
मज मिठीत घे तू हरी सत्वरी.......
तव मिठीत विरघळणा-या मज स्मरती लाघववेळा.....
अैशा ललना स्वयेचि देती आलिंगन ज्या.....
नलिनीदल आलिंगन.....
प्रिये ये ना बाहुपाशी......
कर पडलेत गळ्यात तुझे......
केवढी ही मराठी भाषेची संपन्नता
मिठी ,अलिंगन ,बाहुपाश ,करांचा विळखा
नुसते शब्द ऐकुनही अंगावर रोमांच उभे रहावे
आणि या सगळ्याला फिरंग्यानी काय म्हणावं तर "हग"????