एकदा एका शाळेंत शिक्षण अधिकारी शाळा तपासायला आले.
एका वर्गांत त्यांनी फळ्यावर NATURE अशी अक्षरे लिहिली
आणि एका मुलाला विचारले :
हा काय शब्द आहे?
क्षणाचाही विलंब न लावता मुलगा म्हणाला ” नटुरे”.
त्यानंतर एक एक करून सर्व मुलांना तोच प्रश्न विचारला. सर्व मुलांनी तेच सांगितले “नटुरे”.
डेप्युटी संतापले. शिक्षकाला म्हणाले : हा काय प्रकार आहे?
शिक्षक उत्तरले : पोरं अजून मटुरे (mature) झालेली नाहीत. नंतर सुधारतील.
अधिकारी वैतागून सर्वांना घेवून हेड- मास्तरांकडे गेले व त्यांना झालेला किस्सा सांगितला.
त्यावर शांतपणे हेडमास्तर म्हणाले : जाऊ द्या हो साहेब !!!
या गोष्टीचा त्यांच्या फुटुरे (future ) वर
कांहीच परिणाम होणार नाही
Edited By - Priya Dixit