rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अशक्य जोक: कहर

व्हॉट्स अॅप मराठी विनोद
गुरुजी : गण्या सांग बर प्राचीन भारतात गणित आणि भुमिती किती प्रगत होती.
गण्या : श्रीमद् भगवतगीतेत पार्थ म्हणून ज्या अर्जुनाचा उल्लेख केला, त्या पार्थाचा गौरवर्णिय यवनीपासून झालेला पुत्र म्हणजेच पार्थागोरस(पायथ्यागोरस)..!! 
हा पुत्र यवनीच्या पोटी जन्मला असल्याने त्यास सर्वजण विदेशी म्हणून हिणवू लागले.
तेव्हा अर्जुनाचा सहोदर बंधु कुंतीपुत्र कर्ण याने त्यास आश्रय दिला, कारण तोही कुंतीपुत्र असूनही उपेक्षित वर्गातील होता.
"पार्थागोरस, तू आणि मी पांडव असूनही एकाच उपेक्षित वर्गातील आहोत , तुझा नि माझा वर्ग एकच आहे".
कर्णाच्या वाक्याने 'कर्ण' आणि 'वर्ग' हे दोन शब्द, पायथागोरसच्या मनावर लहानपणीच कोरले गेले.
त्यामुळेच कर्णाच्या या कृतीने उपकृत होवून पायथागोरस ने कर्ण हा ईतरांपेक्षा मोठा असा सिद्धांत मांडला.
त्यातूनच पुढे कर्ण वर्ग हा इतर दोन भुजांच्या वर्गाबरोबर असतो असे मत मान्य झाले.
त्याच्या या सिद्धांताचे विचार वर्तुळ व्यास मुनीनी पुर्ण केल्यामुळे, वर्तुळाचा व्यास हा वर्तुळास दोन समान भागात विभागतो असा गणितीय सिद्धांत पुढे प्रसृत झाला.
कंस हा तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचा मामा. तो गणितात कच्चा होता, देविकीच्या मुलांना मारताना त्याचे गणित चुकले आणि कृष्ण जन्म होउन मृत्यू अटळ बनला.
कृष्णाच्या हातून मोक्ष प्राप्ती होत असताना कंसाची ईच्छा प्रकट केली होती की, गणितात माझ्या नावाने कांहीतरी असावे म्हणून, कंसाच्या वधानंतर त्याचे स्मऱण असावे म्हणून गणितात ( ) कंस वापरतात.
यावरून प्राचीन भारतात गणित आणि भुमिती किती प्रगत होती, हे सिध्द होते.
गुरूजी ICU मध्ये आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाहुबली 2 सोबत डबल ट्रीट