Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टीव्हीकडे पाय करून झोपायला भीती वाटते...

webdunia
आजकाल टिव्ही वर एवढे देवांचे प्रोग्रॅम लागत आहेत की रात्री झोपताना टीव्हीकडे पाय करून झोपायला पण भीती वाटते, पाप लागेल की काय? 
 
जेव्हापासून बुलेट मध्ये Self Starter आले आहे तेव्हापासून एका झापडीत खाली पडणारे लोक सुद्धा बुलेट घेऊन फिरायला लागले आहेत
 
हरवलेलं प्रेम एक वेळा परत मिळेल पण गाडी पुसायचा फडका कधीच परत मिळणार नाही. फडकी चोर साले
 
मोबाईल वापराचा आता इतका अतिरेक झालाय, पर्वा शेजारी बसलेला एक जण पेपरमधील चित्र बघता बघता अचानक २ बोटांनी झूम करायचा प्रयत्न करायला लागला होता.
 
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका…. जी व्यक्ती तुम्हाला वेळेवर तंबाखू देते
.
मिटिंग मध्ये बॉसच्या जोकवर तोच जोरात हसतो ज्याचा EMI सर्वात जास्त असतो
 
आमच्याकडे एक इंजिनियर आहे त्याच्या कामात चूक काढली की त्याचे नेहमीचे वाक्य, “साहेब लय बारीक बघितलं की बाईला पण मिशा दिसत्यात”
बायका फार नशीबवान असतात कारण त्यांना बायका नसतात
 
हे एक गोष्ट खरी आहे हा… जगात सर्व माणसांची वेगवेगळी नवे आहेत पण गर्दीत जेव्हा आपण एखाद्याला आवाज देतो, “ए माकडा” तेव्हा १५ पैकी १२ जण तरी मागे वळून पाहणारच...
 
अॅक्टीवाच्या सायलेंसरवर बायकोचं नाव लिहिलं तर “बुलेट” चा आवाज येतो म्हणे….
 
लहान असताना झोपेत हसलो की आई म्हणायची सटवाई खेळवते आणि आता हसलो तर बायको म्हणते कोणती सटवी खेळवते
 
I-Phone 7 हा लगातार सातवा असा फोन आहे जो आपल्याकडं नाहीये...
 
तुमचा बेस्ट फ्रेंड जर चुकिच्या मुलीच्या प्रेमात पडला असेल तर त्याला अडवू नका कारण अक्कल बदाम खाल्ल्याने नाही धोका खाल्याने येते
.
त्या मुली पण काही आतंकवाद्यांपेक्षा कमी नव्हत्या. ज्या सर वर्गात येताच आठवण करुन द्यायच्या– सर आज तुम्ही गृहपाठ चेक करणार होता ना?
 
“बघून घेईन” म्हणत आयुष्य वाया घालवण्यापेक्षा “घेऊन बघतो” म्हणा आणि आयुष्य सार्थकी लावा
 
काय दिवस आलेत… चौथी पाचवीची पोरं प्रेमाच्या गप्पा मारतायंत..आणि तरुण पोर pokemon पकडत फिरतायंत...
 
समस्त स्त्री जातीला पडलेला एक गहन प्रश्न – पुरुष तर कधीच उपवास करत नाहीत तरीही त्यांना आपल्या सारख्या चांगल्या बायका कशा मिळतात??
 
सर्वच आईवडिलांचा सर्वात सुंदर डायलॉग – डोकं तर खूप आहे त्याला पण तो अभ्यासच करत नाही
 
काही लोक नाकात बोट घालून बोट असे पाहतात की जसे नाकातून हिरा निघालाय...
 
ज्यांचे पुण्य अपार असते … त्यांच्या बायकोचे माहेर किमान ३०० किलोमीटर दूर असते...
 
लग्नाच्या वरातीत कितीही नाचणारे तीस मर खान येउद्यात हवा फक्त त्याचीच होते जो झोपून नागीण डान्स करतो.
 
भारत सरकारचा नवीन नियम ज्यांचा मोबाईल कँमेरा २ मेगा पिक्सेल आहे अशांना दारिद्र रेषेखालील घोषित करण्यात येईल.
 
एक माणूस मच्छिवालीला : ए मावशी या सुरमई मध्ये गाबोळी (अंडी) आहेत का? मच्छिवाली : ए बाबा, मच्छि वजन करून देतात, सोनोग्राफी करून नाही...
 
तुम्हाला माहित आहे काय पॉपकॉर्न कढईत ठेवल्यावर उड्या का मारतात? स्वतः गरम कढईत बसून पहा, मग आपोआप समजेल
 
बायकांना खुश ठेवणे खूप मुश्किल आहे... पुरुषांचे काय…. बायका दिसल्या की खुश होतात
.
व्यायाम करणे, ड्रिंक्स न घेणे व शाकाहारी राहणे ह्याने तुमच्या आयुष्यात काही वर्ष नक्की वाढतील पण लक्षात ठेवा की ही वर्षे तुमच्या म्हातारपणातली वाढणार आहेत, तरुणपणातली नव्हे.
 
बासुंदीचा फुल फॉर्म सापडला : बाई सुंदर दिसते
 
ATM मधून २०० रुपये निघताना इतका आवाज होतो की असं वाटतं की चुकून ४-५ हजार निघतात की काय…
 
चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो देवमाणूस आणि जो कधी चुकतच नाही तो बायकोच्या माहेरचा माणूस

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

भिऊ नकोस मी तुझा पाठीशी आहे