Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी जोक्स : मी आजपासून पिणे सोडले आहे..

मराठी जोक्स : मी आजपासून पिणे सोडले आहे..
, शनिवार, 17 जून 2017 (10:56 IST)
एकदा एक माणूस एका बारमधे जातो व तीन बीयरचे ग्लास मागवतो .
तो तिन्ही ग्लास मधून थोडी थोडी बीयर पीत रहातो...
बार मालकाला रहावत नाही, तो असे पिण्याचे कारण विचारतो...
तो माणूस सांगतो...
आम्ही तिन जिवलग मित्र आहोत. सध्या वेगवेगळया जागी रहात आहोत. सोबत पिण्याची आठवण म्हणून आम्ही तिघेही असेच पितो..
असे बरेच वर्ष चालते.
एक दिवस तो माणूस दोन बीयरचे ग्लास  मागवतो...
बार मालकाला शंका येते की एखादा मित्र वारला की काय ?
तो त्या माणसाचे सांत्वन करु लागतो.
त्यावर तो माणूस म्हणतो...
" अरे तसे काही नाही.... दोघेही ठणठणीत आहेत... "
बार मालक : मग आज दोनच ग्लास  का ?
माणूस : मी आजपासून पिणे सोडले आहे..
अशी मैत्री असावी 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Viral झाले दिशा ची Throwback Thursday वाले फोटो!