Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पारायण....... ( संसाराचे)

पारायण....... ( संसाराचे)
कधी कधी ना एखादा दिवसच कसा अगदी सर्वसामान्य निघतो..... म्हणजे उठायला पाच दहा नाही चांगला पंधरा मिनिट उशिर होणे....... ऊठल्या नंतरही मग हे आधि करू की ते करू यात अजून पंधरा मिनिटं जाणे.......... भाजी चिरून ठेवलेली नसणे........ पोळीवाली पोळ्या केल्यानंतर ओटा तसाच ठेवून निघुन जाणे.............. कस तरी सगळ सावरून अंघोळीसाठी गेल कि साबणाचा अगदी तुकडाही नसणे............ चहासोबत बिस्कीट खायची ताीव्र इच्छा झालेली असताना डब्यात फक्त रॅपर सापडणे..... अशा छोटय़ा छोटय़ा कटकटीतुन सुरू झालेला दिवस..... आॅफिस मधुन आल्यावर लाॅक उघडुन बघितल्यावर भांड्यांचा ढिगारा तसाच दिसणे.... फरशी  पुसलेली नसणे.... कपडे वाळत टाकलेले नसणे... म्हणजे कामवालीने सुट्टी मारलेली असणे.... इथ पर्यंत येवून पोचतो..... एव्हाना संध्याकाळचे पाच वाजलेले असतात..... 
      असताे एखादा दिवसच असा असतो...... अशा वेळी एकच करायचं.... केसांना क्लचर लावायचा... जुना एखादा गाउन चढवायचा...... आणि काय..? एका हातात झाडु... दुसऱ्या हातात फडकं घ्यायचं..... रेडिओ आॅन करायचा..... आणि fulllll volume मध्ये सफाई करायची....... तिकडे रेडिओ वर जोरात '' मै हुं डाॅन.... मै हु डाॅन...... '' चालु झालं कि आपण ही दणाद़ण झाडु मारायचे........ तिकडे... '' तुझको बनाकरके ले जायेंगे बदरी कि दुल्हनीया... '' चालु झालं की दणाद़ण भांडी घासुन... मनातल्या मनात.. 
''काय करते दुल्हनिया बनुन..? भांडीच घासावी लागतात..... असं म्हणायचं अन् चालुच रहायचं..... थां$$$$$$बायचं नाही......... असं केलत ना तर बघा अर्ध्यातासात काम संपतं कि नाही..... '' मग रात्री* वन डिश मील''असं छान नाव देऊन सगळ्यांना खिचडी खाऊ घालायची..... वरून किती काम केलं याचा पाढाही वाचायचा..... नाही काय करणार आहे ते सगळ्यांना सांगायचं....... गाण लावुन एन्जॉय केलेलं चुकुनही सांगायच नाही............. पुन्हा मीच किती काम करते हे ही सांगायच.......... .... असा घालवायचा हुकलेला दिवस..... शेवटी काय गं मैत्रिणींनो आपलं म्हणजे कसं...* '' रोज मरे त्याला काेण रडे? ''असं आहे.......... आपणत आपले दिवस मजेत घालवायचे......... चेहर्‍यावर स्वच्छ ख़ळखळतं पाणी मारायचं....... आरश्यात बघायचं...... स्वतःकडे बघुन प्रसन्न हसायचं..... आणि म्हणायचं. कित्ती मी हु$$$$$शार......!
       सकाळी उठुन कामवाली आली कि तिला अजिबा$$$$त न रागावता प्रेमाने विचारायचं.... का गं काल बरं नव्हतं का आली नाहीस कामाला..... तब्येत बरी नव्हती ना.... जाऊ दे.... चहा करू का तुला आल्याचा......?
    असंही विचारायचं........... अन् या संसाराच्या पारायणाचाएक अध्याय संपवायचा..... 
 
योगिता कुलकर्णी, पुणे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जीवनात रस्ता दिसत नसेल तर