Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नोटबंदीचा पाळणा

नोटबंदीचा पाळणा
, सोमवार, 19 डिसेंबर 2016 (13:41 IST)
पहिल्या दिवशी झाली नोटबंदी
देशभक्तीची चढली सर्वांना धुंदी 
काळ्या पैश्याची सापडेना मुंडी
जो बाळा जो जो रे जो sss
 
दुस-या दिवशी आला आदेश
रांगेत उभा अवघा हा देश
भक्तगणांचा भारी जल्लोष 
जो बाळा जो जो रे जो sss
 
तिस-या दिवशी वाढला ताण 
चलनाची सर्वत्र झाली चणचण
प्रधानसेवक जाती जापान 
जो बाळा जो जो रे जो sss
 
चवथ्या दिवशी नवा कहर
नोट काढली दोन हजार
सुटे मिळेना झालो बेजार
जो बाळा जो जो रे जो sss
 
पाचव्या दिवशी पाचावर धारण
रांगेत आले अनेकांना मरण
काळा पैसा तरी येईना शरण
जो बाळा जो जो रे जो sss
 
सहाव्या दिवशी संताप संताप
नव्या नियमांचा नवाच ताप 
गडकरी वाड्यात लग्न थाटात
जो बाळा जो जो रे जो sss
 
सातव्या दिवशी काय सांगू कथा
संपेना सा-या देशाची व्यथा
एटीएम पुढे फोडतो माथा
जो बाळा जो जो रे जो sss
 
आठव्या दिवशी क्याशलेसचा मंत्र
फडणवीस घेती डिजिटल संत्र
गरीब शोधतो भाकरीचा चंद्र
जो बाळा जो जो रे जो sss
 
नवव्या दिवशी नवल घडे
नव्या नोटांचे घबाड सापडे
भ्रष्टाचाराला गाडला का रे ?
जो बाळा जो जो रे जो sss
 
आता होतील दिवस पन्नास
आठवले मला आश्वासन खास
मिळेल का दिलासा आता देशास ?
जो बाळा जो जो रे जो sss
 
               - मिलिंद मधुकरराव उमरे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

येत्या २२ तारखेपासून अंकुर फिल्म फेस्टिव्हल राष्ट्रीय पारितोषिक विजेते कमल स्वरूप यांची हजेरी