मी काय चोवीस तास घरातच असते
मला भेटायला काही वेळ -बिळ घ्यावी लागत नाही
केंव्हा ही या मोकळ्या गप्पा मारायला
गरम गरम भजे खायला
ओळखा पाहू मी कोण ???
अरे नाही ओळखलंत
अहो मीच ती ,
कुठल्याही फॉर्मवर designation च्या समोर ,खिन्न मनानं house wife म्हणून लिहणारी ---------
पण यापुढे ही खिन्नता सोडून मी पण आत्मविश्वासाने म्हणणार आहे
होय मी गृहिणी आहे
।। होय मी गृहिणी आहे ।।
या घरकुलाची स्वामींनी "गृहस्वामींनी"
चार भिंतीत राहणारी,नाही हो
चार भिंतीच्या बाहेर उडण्याचं प्रशिक्षण देणारी मी"प्रशिक्षिका"
सदा स्वयंपाकघरात मग्न असणारी ,छे छे
सर्वांच्या रसना तृप्त करणारी
मी "अन्नपूर्णा "
सतत घरातील पसारा आवरणारी,
नाही हो
पसाऱ्याच व्यवस्थापन करणारी
मी "व्यवस्थापिका "
मुलांच्या मागे अभ्यासाची कटकट करणारी ,छे ,छे
त्यांना सुजाण नागरिक बनवणारी
मी "शिक्षिका "
घरातील थोरा मोठ्यांच्या सेवेत वेळ घालवणारी ,नाही हो
त्यांच्या आशीर्वादाचं कवच प्राप्त करणारी ,मी "परिचारिका "
सहचारासाठी नवनवीन साजशृंगार करणारी ? छे छे
गृहस्थाश्रमाचा भक्कम आधार असणारी ,मी "मुग्ध कलिका "
समाजातील अनिष्ट प्रथा कुप्रथांकडे दुर्लक्ष करणारी ? नाही हो
त्यांच्या निर्दालनासाठी सज्ज असलेली "मी सेविका"
अशी आहे मी गृहिणी !!!
फक्त गृहिणीच नव्हे तर ,तर ,
अष्टावधानी अष्टभुजा !!!!
अष्टवधानी अष्टभुजा !!!!