Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Whats app message ...दमलेली ती...

Whats app message ...दमलेली ती...
, गुरूवार, 27 एप्रिल 2017 (21:23 IST)
ट्रेन समोरून येताना दिसली ,
आणि रोज सारखंच तिने मनात म्हटलं,
"देवा नीट चढून दे, एक सीट मिळून दे"
 
देवा ने पण रोज सारखंच
आज पण तिचं ऐकलं.
बसली ती एकदाची!
 
२ मिनिटं सीट मिळाल्याचा
आनंद उपभोगल्यावर
तिला अचानक प्रश्न पडला,
"आता काय बरं करू.... ??"
 
मग ती स्व:ताच हसली,
तिला कालचा नवर्याचा प्रश्न आठवला
" नक्की एव्हढं दमायला काम काय असतं?"
 
नवर्याला कधी समजणारच नाही
कि नक्की का दमायला होतं.
 
मग तिने डोळे बंद केले आणि
सकाळ आठवली.... आज ची आणि रोजचीच सकाळ!
 
सकाळी उठल्यावर लक्षात हि
यायच्या आधी कढई खालचा गॅस लागतो
आणि कणिक भिजवलं जातं.
 
संध्याकाळी घरी येताना,
आज नक्की काय न्यायचा आहे
हा विचार ट्रेन थांबल्या पासूनच सुरु होतो.
 
रात्री आज घरच्यांना कंटाळा येईल
म्हणून भजी करू कि खीर
हा प्रश्न कुक्कर च्या शिट्टी पासूनच मनात रेंगाळतो.
 
पण तरी, नवरा कधी कधी
किती कौतुका ने म्हणतो कि
"तू लकी आहेस, मला हातात नाही लागत काही,
आपला कप मी स्वतच घेतो..... मला चहा येतो कि करता"
 
मग ती पण कौतुकाने म्हणते "हो खरच कि..... !!!"
 
रोज चा मॅरेथाॅन त्याला
कदाचित कळतच नाही......
 
सकाळी जेवण करताना धावा,
मग रिक्कशे मागे धावा,
मग ट्रेन, मग मसटर.......
आणि बसल्या बसल्या विचारांमध्ये धावा.......
 
तिच्या डोळ्या समोर अचानक आई आली..
"दुध पिण्यासाठी ओरडणारी,
इथे आली कि काही काम करत नाही
हि मुलगी" असं म्हणून चिडणारी,
आणि तरी माहेरी गेल्यावर एका
हि कामाला हातच लावू न देणारी...
 
घरी तर कोणाला कधी कधी
कळत पण नाही,
कि सगळ्यांना नाश्ता, चहा,
जेवण देणाऱ्या तिने,
 
दुपारच्या जेवणाआधी
काही खाल्लं पण नसतं.
कळलंच नाही
 
तिला कधी डोळे पाणावलेत.
तिने जरा डोळे उघडलेत....
 
ओल्या डोळ्यांना स्टेशन दिसलं....
अरे आलं कि आपलं स्टेशन.....
चला, परत धावा धाव सुरु.....
बस मिळायला नको का??? 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सायनावर सिनेमा, श्रद्धा कपूर साकारणार भूमिका