Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुमच्याकडे फक्त एकच आयुष्य आहे.....

तुमच्याकडे फक्त एकच आयुष्य आहे.....
, मंगळवार, 9 मे 2017 (15:21 IST)
1) एक मुलाने २० वर्षानंतर त्याच्या एका मित्राला मर्सिडीज चालवताना पाहिलं. त्याला स्वतःबद्दल खुप वाईट वाटलं, की तो आयुष्यात नापास झाला आहे.
 
पण 
त्याला हे माहित नव्हतं की तो मित्र त्या गाडीवर ड्रायव्हर होता व तो त्याच्या बॉस ला घ्यायला निघाला होता.
 
2) एक स्त्री तिच्या नवऱ्यावर नाराज होती की तो अजिबात रोमॅन्टिक नाही, त्याने गाडीतून उतरताना तिच्यासाठी दरवाजा उघडावा जसा तिच्या मैत्रीणीचा नवरा उघडतो.
 
पण 
तिला हे माहीत नव्हतं की मैत्रीणीच्या गाडीचा दरवाजा खराब आहे व तो फक्त बाहेरूनच उघडला जातो.
 
3) एक व्यक्ती शेजारील घरातील तीन मुले खेळताना बघून नाराज होत होता की त्याला फक्त एकच मुलगा आहे.
 
पण 
त्याला हे माहीत नव्हतं की त्या तीन मुलांपैकी एक दुर्धर रोगाने आजारी आहे व बाकीची दोन मुले  दत्तक घेतलेली आहेत.
 
आयुष्यात प्रत्येक गोष्ट एकाच तराजूत मोजली नाही जाऊ शकत. म्हणून बाकीच्या लोकांकडे बघून तुमच्या आयुष्याबद्दल तक्रार करू नका.
कारण तुम्हास हे माहीत नसेल की इतरांपेक्षा तुम्हीच जास्त नशीबवान असू शकता.
तुम्ही जसे आहात तसेच आयुष्य मजेत घालवा कारण तुमच्याकडे फक्त एकच आयुष्य आहे.
 
आनंद हा माझ्याकडे सर्वकाही आहे यातून येत नसून, माझ्याकडे जे आहे त्यातून सर्वोत्तम काय मिळेल यामध्ये आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

...म्हणून खास आहे ‘चि. व. चि. सौं. का.’ चं शीर्षक गीत