जरी जीवन पन्नाशीला आले
कसे मान्य करावे?
बालपण खेळण्यात गुंतले
कुमार वयाला अभ्यासाने घेरले
तारूण्य करीअरसाठी घातले
जग रहाटी म्हणून लग्न केले
मुलांचे भविष्य त्यात घडविले
वाटले, जीवन आता सुरू करावे
अन् ,तुम्ही म्हणता वय झाले
कसे मान्य करावे?
वयात या आवडी निवडी जपावे
राहिले छंद ते पुरे करावे
जग फिरायचे फिरून घ्यावे
मित्रांसवे वय विसरावे
जगणे आता सुरू करावे
अन् तुम्ही म्हणता वय झाले?
कसे मान्य करावे?
राहीलेले जीवन जगून घ्यावे
सुखदुःखाना का आठवावे?
भेटतील साथी संगे घ्यावे
क्षणा-क्षणाला जगून घ्यावे
वयाचे बंधन कश्याला असावे?
अन् तुम्ही म्हणता वय झाले
कसे मान्य करावे?