Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Whats app Message : लास्ट सीन...

Whats app Message : लास्ट सीन...
, गुरूवार, 1 जून 2017 (15:15 IST)
आज सकाळपासूनच आई खूप अस्वस्थ दिसत होती. पाच-पाच मिनिटांनी मोबाईल चेक करत होती . संध्याने आईकडे पाहिले अन ती उगीचच हसली. म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण म्हणतात ते उगीच नाही काही.....असे स्वतःशीच म्हणत पुन्हा आवरु लागली  . मधुनच आईची घालमेल पहात होतीच. ' माधवचा फोन आलाय का  ...काही बोललाय  कोठे आहे...:न राहवुन आईने विचारले. 
माधव ....आई अजूनही मोबाईल कडे पहात होती....
अग वेळ मिळाला की करेल तो फोन....एवढी अस्वस्थ का होतेस ? संध्या म्हणाली...तसा
आईने मोबाईल पुढे केला  . बघ ना.....लास्ट सीन दिसतच नाहीये ग...त्याच नाव तेवढे दिसते.....मी म्हनतच नाही मुळी त्याने फोन करावा सारखा...पण त्याचे लास्ट सीन पाहिले ना फक्त तरी बर वाटत बघ मनाला....ना का बोलेना.....तो ठिक आहे अशी खात्री पटते मनाची. दोन दिवसापासून तस काही दिसतच नाहीये बघ...आई अस्वस्थपणे बोलली...अन संध्या नकळत मनातुन हलली...माधवला फोन लावला....लगेच लागला....कधी नव्हे तो.....कसा आहेस रे......तिने अधीरपणे  विचारले. ठीक आहे की....असा अवेळी फोन केलास तो.....आई ठीक आहे ना.....त्याने विचारले तसा तिने फोन आईकडे दिला .' कसा आहेस रे बाळा.'.....बोलता बोलता तीचा गळा भरून आला. तुझा मोबाईल ठीक कर  बर आधी....आईने फर्मावले. 'का बुवा.....काय केले त्याने ' ....माधवने हसून विचारले. अरे लास्ट सीन नाही दाखवत तुझे .....तूम्ही नका रे बोलु नेहमी....पण ते लास्ट सीन मला अपडेटस देत राहते तुझे ...तुझ्याही नकळत...तु  ठीक आहेस हा विश्वास देते ...तेवढे पुरेसे असते रे मला.... माझा ऑक्सिजन असतो तो.....काहीही करा पण ते लास्ट सीन च फीचर नका घालवू.....आईने कळकळीने सांगितलें नकळतच संध्या अन तेथे दूर माधवचेही डोळे ओलावले ...मोबाईल च्या या फीचर चा नवा अवतार आज दोघांनी अगदी नव्याने अनुभवला होता...
माधव चेक करत होता आईचे लास्ट सीन अपडेट....प्रथमच...

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Marathi Movie boyz : किशोरावस्थेवर भाष्य करणार 'बॉईज' सिनेमा