ज्ञानेश्वर माउली नंतर समाधी नाही |
तुकोबा नंतर वैकुंठ गमन नाही ।
शिवराया नंतर छत्रपती नाही |
बालगंधर्वा नंतर गाणं नाही |
रामा नंतर आचरण नाही |
रावणा नंतर श्रीमंती नाही|
गरुडा नंतर भरारी नाही |
मेघा नंतर उदारता नाही |
कर्णा नंतर औदार्य नाही |
साधु नंतर कृपा नाही |
आई नंतर प्रेम नाही |
मृत्यू नंतर भय नाही |
नर देहा नंतर पुन्हा देह नाही |
आणी
जिवन जगताना हे कधीच विसरायचे
नाही ।
म्हणून
चांगलं वागता आलं नाही तरी चालेल पण
जाणीवपुर्वक वाईट कधीच वागायच नाही ।
सदाफुली सांगते रुसुन रुसुन रहायच
नसत हसून हसून जगायच असत.
रातराणी सांगते अंधाराला घाबरायच
नसत काळोखात ही फुलायच असत.
गुलाब सांगतो येता जाता रडायच
नसत काट्यात सुद्धा हसायच असत
बकुळि म्हणते सावळ्या रंगाने हिरमुसायच
नसत गुणाच्या गंधाने जिंकायच असत
कमळ म्हणते संकटाच्या चिखलात बुडायच
नसत संकटाना बुडवून फुलायच असत.
... शुभ दिवस…