Publish Date: Mon, 25 Sep 2017 (14:34 IST)
Updated Date: Mon, 25 Sep 2017 (14:39 IST)
सरस्वती होऊन
मुलांचा अभ्यास घेते आहे
दुर्गा होऊन
संकटांशी सामना करते आहे
कालिका, चंडिका होऊन
घराचे रक्षण करते आहे
गृहलक्ष्मी होऊन
कुटुंबाला सांभाळते आहे
तिची पूजा नको
स्त्री म्हणून सन्मान व्हावा ।।।।