Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोट धरून हसा...

पोट धरून हसा...
पुणेरी टोमणे एरलाईन्स (पु.टो. एरलाईन्स) चे एक स्वतंत्र विमानतळ 
 
Welcome to PuTo airlines 
 
लोकं विमानात चढली, अन् अनाउंसमेंट झाली
 
"सर्वांनी आपापल्या जागेवर पटापट बसून घ्यावे, आपल्या घरातील पॅसेज मध्ये फिरल्या सारखे विमानात इकडून तिकडे फिरत बसू नये"  
 
हवाई सुंदरी आता सेफ्टी डेमो देत आहेत,
 
"डेमो एकदाच दाखवला जाईल,, सर्वांनी आमच्या चेहर्‍याकडे न पाहता हाताकडे लक्ष देवून नीट डेमो पहावा, नंतर तक्रार चालणार नाही"  
 
"हा सिटबेल्ट असा घट्ट बांधावा, सिटबेल्ट फार ताणू नये, तुटल्यास पैसे भरून द्यावे लागतील"  
 
"पोट फारच सुटले असल्यास, सीटबेल्ट ओढून ताणून बांधण्याचा आग्रह करू नये, तुम्हाला वेगळी सुतळी दिली जाईल" 
 
"ऑक्सिजन चा दबाव कमी झाल्यास वरून ऑक्सिजन मास्क पडतील, ते पटापट तोंडावर लावावे, याचा मास्क काळा माझा पिवळा का वगैरे वाद घालू नये, सर्वाना सेमच ऑक्सिजन पुरवठा होईल"  
 
"संकटकाळी स्थितीत विमानाचे पुढचे 2 आणि मागचे 2 दरवाजे उघडतील, एकेकानी सय्यम ठेवून उतरावे, फार धक्काबुक्की, गडबड केल्यास दरवाजे आपोआप बंद होतात, अडकून बसावे लागेल"  
 
"तुमच्या डोक्यावर एअर होस्टेस ला बोलवायचे गुलाबी बटन आहे, त्याला अजिबात हात लावू नये"  
 
"नाष्टया मध्ये जे असेल तेच मिळेल, आम्हाला वडापाव, भेळ, मिसळच पाहिजे वगैरे हट्ट चालणार नाही, हि सारसबाग नाही"  
 
"एक्स्ट्रा कांदा व सॅम्पल मिळणार नाही, पैसे देतो हो वगैरे ऐकून घेतलं जाणार नाही"  
 
"दुपारी 1 - 4 या वेळेत विमान असेल त्या जागी बंद करण्यात येईल, काळजी नसावी"  
 
"विमान तुमच्या डेस्टिनेशन ला पोचल्यावर पटापट उतरावे, निवांत बाहेर पडायला हे चित्रपटगृह नाही"  
 
"डोळ्यावर काळा चष्मा आणि खांद्यावरील सर्व भाग स्कार्फ ने झाकलेला आढळल्यास अतिरेकी समजून उडत्या विमानातून ढकलून देण्यात येईल."  
 
" तुमचा प्रवास सुखकर होवो !"
.
.
.
.
.
.
.
.
.
.
 
" आता हि पोस्ट कॉपी करून पुण्याच्या जागी दुसऱ्या शहराचे नाव टाकुन तुमच्या पेज वर रिपोस्ट करू नये, काही गोष्टी पुण्यालाच सूट होतात " 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लग्न झाले का तुझे?