जाधव वहिनी : तुमाला पावूस आवडतो का वं ?
धुमाळ वहिनी : तर वो .. मला तर लै म्हंजी लै म्हंजी लैच पावूस आवडतो..
जाधव वहिनी : आन पावसात भीजायला आवडतं ?
धुमाळ वहिनी : आवं पावसात भिजायसाठी कवाबी तय्यार आसतीया मी ..
जाधव वहिनी : न्हाय .. म्हंजी येकच दिवस आवडतं का समंद पावसाळा हुईस्तोर ?
धुमाळ वहिनी : आक्खा पावसाळा हुईस्तो मला आवडतंय ... पर तुमी का म्हून येवढ बारीकसारीक इचारायलास ?
जाधव वहिनी : न्हाई .. म्हनल येवढ पावसात भिजाय आवडतंय तर आम्ची गेल्या वर्षी घ्येतल्याली छत्री म्हागारी कवा देनार मग