Publish Date: Thu, 15 Dec 2016 (11:36 IST)
Updated Date: Thu, 15 Dec 2016 (11:46 IST)
आवडतेच मला मी ....
जशी आहे तशी...
थोडीशी अल्लड ...
खटयाळ....
असुदे...
उलटलेली चाळीशी...
मी मात्र नाहीच चढवणार...
झूल
प्रौढपणाची...
आवडते आजही पावसात भिजणे...
पुस्तक वाचत मध्येच पावसाला ..निरखणे...
अजुनही मस्त नाचते...
मनातल्या तालावर...
आणि हव तेंव्हा खुशाल हसते...
एखाद्या पाणचट विनोदावर...
अशीच आवडते...
मी मला...
न आवडू दे अजून कुणा...