एकदा एका माकडाला अति दु:खामुळे मरण्याची इच्छा झाल्यावर त्याने झोपलेल्या सिंहाचे कान ओढले....
सिंहाने उठून रागाने गर्जना केली की हे धाडस कोणी केले ???
स्वतःच्या मृत्यूला कुणी बोलावले ?
माकड : मी कान ओढले महाराज ! सध्या मित्र नसल्यामुळे मी खूप उदास आहे आणि मला मरण पाहिजे आहे, तुम्ही मला खाऊन टाका....
सिंहाने हसून विचारले : माझे कान ओढताना तुला कोणी पाहिले तरी नाही ना ?
माकड : नाही महाराज....
सिंह : मग ठीक आहे, आणखी एक दोन वेळा कान खेच.... खूप छान वाटले....
या कथेचे सार
एकटा राहून जंगलाचा राजाही कंटाळतो….
म्हणून आपण आपल्या मित्रांच्या सतत संपर्कात रहा, त्यांचे कान ओढत रहा ..