Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

!! थोड जगलं पाहिजे.........!!

womens day
आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फोटो असतात,
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्हज् मात्र शिल्लक नसतात.
 
गजर तर रोजचाच आहे
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom & Jerry पाहिलं पाहिजे.
 
आंघोळ फक्त दहा मिनिटे?
एखाद्या दिवशी तास घ्या,
आरशासमोर स्वतःला
सुंदर म्हणता आलं पाहिजे.
 
भसाडा का असेना
आपल्याच सुरात रमलं पाहिजे,
वेडेवाकडे अंग हलवत
नाचण सुध्दा जमलं पाहिजे.
 
गीतेचा रस्ता योग्यच आहे
पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर
"बेवॉच" सुध्दा एन्जॉय करता आली पाहिजे.
 
कधी तरी एकटे
उगाचच फिरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.
 
संध्याकाळी मंदिराबरोबरच
बागेत सुध्दा फिरलं पाहिजे,
"फुलपाखराच्या" सौंदर्याला
कधीतरी भुललं पाहिजे.
 
द्यायला कोणी नसलं
म्हणून काय झालं?
एक गजरा विकत घ्या
ओंजळ भरुन फुलांचा नुसता श्वास घ्या.
 
रात्री झोपताना मात्र
दोन मिनिटे देवाला द्या,
एवढया सुंदर जगण्यासाठी
नुसतं थँक्स तरी म्हणा..!!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या स्त्रीप्रधान सिनेमांमध्ये टक्कर