माझी नोकरी म्हणजे पैसे मिळवणे याहूनही खूप काही आहे ,
ती माझा मोकळा श्वास आहे ,
समदुःखी मैत्रिणींचा सहवास आहे ,
जीवनविषयक अभ्यास आहे ,
तो माझा आत्मविश्वास आहे ,
मनमोकळ्या हास्याचा तास आहे ,
अनुभवाचे आकाश आहे ,
चार भिंतीबाहेर पडण्याचा पास आहे ,
तिथ काम असूनही विश्रांतीचा भास आहे ,
घरगुती ताणतणावातून सुटकेचा निश्वास आहे ,
कतृत्व सिद्ध करायचा ध्यास आहे ,
म्हणून जाण्यायेण्याचा त्रास आहे तरी मला नोकरीची आस आहे