Select Your Language
खूप काही मनात आहे....
, शुक्रवार, 13 मार्च 2015 (16:00 IST)
सांगायच आहे लोभस काही
शब्द वेळी आठवतच नाही
खूप काही मनात आहे
ओठावर कधी आलेच नाही
होता फक्त शब्दांचा खेल
तो मला कधी कळलाच नाही
खूप काही सांगायच होत
मनातल्या मनात राहून गेल
सुखाच घरट बांधण्या आधीच
पाखरू घरटयातल उडून गेल
भावनांचा हा कल्लोल
विस्फोट मनात झाला
माझ्या आठवनींचा प्याला
अश्रुत भरुन वाहीला
एकमेकाना पाहण्यात
जिन्दगी माझी सरुन गेली
शब्द होते वैखरी परी
संस्कार माझे तुटले नाही
विचार आणि भावना माझ्या
एकट्या कधीच नव्हत्या
विचार हृदयाशी ठोके घेत
शब्दांशी खेळत होत्या
डोळ्यात बुडाल सार काही
अश्रुंच्या डोहात पोहताना
मी माझ्या मनाशी
भावना सोबत जगताना
कुणासाठी लिहायच आता
कुणीच माझा नाही
माझ्या साठी लिही रे थोड