रस्त्यात दोन इसमांची भेट झाली. बोलता बोलता विषय टिळकांचा निघाला, तेव्हा
पहिला म्हणाला, " लोकमान्य टिळकांचा `गीतारहस्य' हा ग्रंथ खरोखरच अलौकिक आहे नाही का?"
दुसरा- प्रश्नच नाही. त्या ग्रंथाला तोड नाही.
पहिला- तुम्ही वाचलाय का तो ग्रंथ?
दुसरा- नाही, पण तुम्ही?